• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने भारताचा घेतला धसका

by Guhagar News
May 3, 2025
in Bharat
60 1
0
Pakistan took a blow from India
118
SHARES
338
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसेही केले बंद

नवीदिल्ली, ता. 03 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्येही भीतीचे वातावरण आहे आणि पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी याबाबत संकेत दिले आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. Pakistan took a blow from India

भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच धार्मिक मदरसे १० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. भारताने आक्रमण केल्यास अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असा दावा पीओकेच्या पंतप्रधानांनी केला आहे. आपत्कालीन निधीत एक अब्ज रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत आणि हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि लग्नगृहांच्या चालकांनी त्यांच्या मालमत्ता सैन्याला देण्याचे ठरवले आहे. नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या आसपासच्या संवेदनशील भागात असलेले मदरसे १० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून त्यांना लक्ष्य करू शकतो अशी भीती  पाकिस्तानला आहे. Pakistan took a blow from India

भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवरून मोठी अपडेट येत आहे. पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून बंद केलेले अटारी, वाघा बॉर्डरचे गेट पुन्हा उघडले आहे. पाकिस्तान भारताने देश सोडून जा असे सांगितलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात घेण्याचे देखील बंद केले होते. आता सीमेवरच ताटकळलेले नागरिक त्यांच्या देशात जाऊ लागले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. स्वत:हून जाण्याची मुदत २७ एप्रिलला संपली होती. यानंतर राज्या राज्याच्या पोलिसांनी अधिकृतरित्या आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून बसमध्ये बसवून भारत पाक सीमेवर आणून सोडण्याची व्यवस्था केली आहे. हे नागरिक अटारी आणि वाघा सीमेवर येत आहेत. परंतू, पाकिस्तानने गेट बंद केल्याने त्यांना त्यांच्या देशात जाता येत नव्हते. तोवर भारतीय सैनिक, प्रशासन त्यांची अन्न पाण्याची सोय करत होते. Pakistan took a blow from India

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPakistan took a blow from IndiaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यापहलगाममधील दहशतवादी हल्लामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.