गाडी संध्याकाळी ६ नंतर मतदान केंद्रावर पोहोचल्याने चाकरमान्यांची निराशा
गुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा निवडणुक २०२४ या निवडणूकीची सर्वत्र धावपळ चालू असतानाच गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा या गावात मतदान करण्यासाठी ६० चाकरमानी मुंबई येथून खाजगी गाड्या करुन निघाले होते. परंतू मतदान केंद्रावर संध्याकाळी ६ नंतर पोहचल्याने मतदानापासून वंचीत राहिले. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार नाराज झाले. Pacherisada Chakarmani deprived of voting
आपण आपल्या उमेदवाराला मतदान करू आणि आपलाच उमेदवार विजयी होणार या निश्चयाने मुंबई येथून प्रवास सुरु झाला. खराब रस्ते यामुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे मतदान केंद्रावर पोहचायला उशीर झाला. सांयकाळचे ६ वाजून गेले तरी ६० चाकरमान्यांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या परंतू मतदान केंद्र बंद झाले आणि चाकरमान्यांची घोर निराशा झाली. चाकरमानी मतदानापासून वंचित राहिले आणि कार्यकर्ते नाराज झाले. Pacherisada Chakarmani deprived of voting