गुहागर, ता. 31 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं १ या प्रशालेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मिशन आपुलकी अंतर्गत साई कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा समीर धामणस्कर यांनी सत्तर हजारपेक्षा जास्त रक्कम खर्च करून बांधुन दिलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री सुलोचना धामणस्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच टीडब्ल्यूजे कंपनी व पालकवर्ग वेळणेश्वर यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बोरवेल सुविधेचे माजी मुख्याध्यापक प्यारेलाल मोते व माजी सेवानिवृत्त शिक्षिका विमल सोकांडे यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. Oxygen Park and Borewell facility at Velneshwar
यावेळी समीर धामणस्कर, टीडब्लुजे कंपनी, यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच शाळेतील गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित केंद्रस्तरीय, बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारातील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील लक्षवेधी ठरलेल्या सायबर सुरक्षा प्रकल्पकर्ते विद्यार्थी मुग्धा कनगुटकर, नील जामसुतकर यांचा तसेच प्रशालेस सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यावेळी गौरव करण्यात आला. Oxygen Park and Borewell facility at Velneshwar


रात्री शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलारंग २०२४ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमसाठी गुहागर तालुका गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी संजय गोखले व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री सतीश नलावडे, पदवीधर शिक्षिका शैलजा साळे पदवीधर शिक्षक मंदार कानडे उपशिक्षक उमेश नाटेकर, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर उपशिक्षिका अश्विनी धुमाळ, सुलक्षणा करडे, भारती गोवेकर, स्वयंसेविका पुजा ठाकूर, आकांक्षा खरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर व सर्व सदस्य तसेच विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ बंधुभगिनी वेळणेश्वर यांनी विशेष मेहनत घेतली. Oxygen Park and Borewell facility at Velneshwar
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नेत्राताई ठाकूर वेळणेश्वर वाडदई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विश्वजीत जामसुतकर, प्रसाद तिवरेकर, प्रमोद घाग, नरेंद्र ठाकुर, साक्षी ठाकूर, नव्या आडेकर, विनया नाटेकर, शर्वरी मोरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदेश ठाकूर, माजी सैनिक बाळकृष्ण शिंदे, पोलीस पाटील साईप्रसाद ठाकूर, पत्रकार उमेशजी शिंदे, साई कन्स्ट्रक्शनचे समीर धामणस्कर, डॉ.ध्रुव गोखले, शिवराम गुरव उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीष नलावडे,आदी मान्यवरांची उपस्थित होते. Oxygen Park and Borewell facility at Velneshwar