रत्नागिरी : स्वस्तिक कल्चरल असोसिशनतर्फे (पणजी) लहान मुलांसाठी, कोंकण स्वर प्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी, आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे खास आयोजन केले आहे. ही स्पर्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कारवार, अंकोला, कुमटा, होनावर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, ठोकूर, मंगलोर या कर्नाटक राज्यातील क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आली आहे. Organizing a classical singing competition


स्पर्धा केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय गायनासाठी खुली आहे. प्रत्येक सहभागीने छोटा ख्याल सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धा ५ ते १३ वयोगटसाठी आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, स्पर्धकानी त्यांचे गायनाचे विडियो आयोजकांना १५ मे पूर्वी पाठवावे. व्हिडिओमध्ये तबला व हार्मोनियम किंवा सारंगीसह साथसंगत आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅन्युअल किंवा डिजिटल तानपुरा चालेल. व्हिडियो ५ ते ७ मिनिटांचा असावा. सहभागींनी सादर केलेला राग, ताल व बंदिश स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. अंतिम फेरीसाठी १५ स्पर्धक पात्र ठरतील. अंतिम फेरी पणजी येथे आयोजित करण्यात येईल. याची तारीख व स्थळ नंतर कळविण्यात येईल. Organizing a classical singing competition


अंतिम फेरीत सहभागी स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ३३,३३३ रुपये, द्वितीय पारितोषिक २२,२२२ रूपये, तृतीय पारितोषिक ११,१११ रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक ५,५५५ रुपये देण्यात येणार आहे. स्वस्तिक कल्चरल असोसिएशन ही संस्था गेली अनेक वर्षे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नव नवीन संकल्पना राबवित आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्वस्तिक कल्चरल असोसिएशन गोवा, नवेलकर आर्केड, एसएफ, ०१- बी, बी विंग, दुसरा मजला, डॉ. ए. पी. रोड पणजी, गोवा ४०३००१ या कार्यालयात किंवा स्वस्तिकचे संयोजक सुयोग पटवर्धन (९९२१४४९५९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांमार्फत कळवण्यात आले आहे. Organizing a classical singing competition