रत्नागिरी, ता. 18 : तालुक्यातील जाकादेवी (खालगाव) येथील महा ई सेवा केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालय व समता फाउंडेशन आयोजित नेत्रचिकीत्सा व मोतिबिंदू तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. सौ. वृंदा विश्वास शेवडे आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस व विधी सेल संयोजक (उत्तर) रत्नागिरी अॅड. अभय विश्वास शेवडे यांच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन केले होते. Ophthalmology Camp at Jakadevi
या वेळी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकीत्सा अधिकारी डॉ. संदीप उगवेकर यांनी रुग्णांची तपासणी केली. जाकादेवी येथील रिद्धी सिद्धी ब्लॉग येथे महा ई सेवा केंद्र असून समता फाउंडेशनच्या नितीश शेट्ये यांचे या शिबिरासाठी बहुमोल सहकार्य लाभले. शिबिरात तपासणी केलेल्या काही रुग्णांचे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात मोफत करण्यात येणार आहे. तसेच अन्य काही रुग्णांना चष्मा मोफत देण्यात आला. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आणि श्री. शेवडे आणि महा ई सेवा केंद्राचे आभार मानले. Ophthalmology Camp at Jakadevi