पुणे, ता. 30 : राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. Operation Muskan
या पथकाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन पोलीस कर्मचार्यांचा या पथकात समावेश राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे शहर, तसेच परिसरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे. Operation Muskan
‘ऑपरेशन मुस्कान १३ ’ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेला एक प्रभावी उपक्रम आहे. पुणे शहरातील सर्व पोलीस अधिकार्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. एरवी शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. Operation Muskan