गुहागर, ता. 16 : सततच्या कोसळणऱ्या मुसळधार पावसामुळे तवसाळ फेरीबोट सेवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उन्मळून पडलेल्या सुरूच्या झाडामुळे तवसाळ जयगड फेरीबोट सेवा काही काळासाठी बंद होती. या फेरी बोट सेवेचे महत्त्व दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे आहे. या फेरीबोट सेवेची असणारी गरज लक्षात घेऊन फेरीबोटीचे कर्मचारी, नरवणचे नाटुस्कर बंधू आणि जेएसडब्ल्यू मध्ये कामाला जाणारे कर्मचारी यांनी एकत्रितरीत्या हे सुरूचे पडलेले भले मोठे झाड बाजूला केले. या अडचणीत सुवर्णदुर्ग शिपिंगच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पदच होती. Old ferryboat shock repair demand


२ तासाच्या कालखंडानंतर ही फेरबोट सेवा पुरवत सुरू झाली. या फेरीबोटीकडे जाणारा अंदाजे २०० मीटर लांबीचा रस्ता हा सुरूच्या झाडांमधून जातो. खुप वर्षांपूर्वी लावलेले भले मोठे सुरू अति पावसामुळे वादळ वाऱ्यामुळे उन्मळून पडण्याचे प्रकार सततचे होत आहेत. यामुळे फेरीबोट सेवा खंडित होतेच त्याचबरोबर गावातील वीजपुरवठा सुद्धा खंडित होतो. हा मार्ग बंद झाल्यानंतर जुन्या फेरीबोट मार्गाने म्हणजे तवसाळ खुर्द गावातून ही फेरीबोट सेवा वळवण्याचा प्रयत्न कर्मचारी करतात. मात्र या ठिकाणी असणारा जुना फेरीबोट धक्का नादुरुस्त असल्याने येथे बोट लावणे किंवा बोट लावल्यानंतर त्यामध्ये गाड्या चढवणे हे फारच जिकरीचे असते. यामुळे एखादा धोका पण संभवण्याची शक्यता असते. Old ferryboat shock repair demand
या सर्वांकरता तवसाळ खुर्द येथील जुना फेरीबोर्ड धक्का जर दुरुस्त झाला तर त्याचा पर्याय म्हणून फेरीबोट सेवे करता वापर केला जाऊ शकतो. लोकांची सोय होऊ शकते. फेरीबोट सेवा अखंडितपणे चालू राहू शकते. याचे महत्त्व लक्षात घेऊन तवसाळ गावचे सुपुत्र,जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तवसाळ खुर्द येथील जुन्या फेरीबोट धक्क्याची दुरुस्ती करण्याची मागणी सन्मा.पालकमंत्री नाम.उदयजी सामंत साहेब यांच्याकडे केली आहे. Old ferryboat shock repair demand