बेपत्ता कर्मचाऱ्यांपैकी रत्नागिरीतील सम्रान सय्यद गायब
रत्नागिरी, ता. 18 : ओमानमधील एक तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले यामध्ये १३ भारतीय नागरिक असल्याचं वृत्त आहे. तर एकूण १६ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्दैवी अपघातात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथील एका युवकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून अद्याप कोणीही सापडलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. कसबा येथील सम्रान इब्राहिम सय्यद (वय ४०) हा या दुर्दैवी दुर्घटनेत बेपत्ता झाला आहे. Oil Tanker sunk in the sea
प्रेस्टींज फाल्कन असं या जहाजाचं नाव आहे. सोमवारी हे जहाज ओमानच्या खोल समुद्रात बुडाले अशी माहिती समोर आली. तेलवाहू जहाजावर १६ लोक होते. त्यामध्ये १३ भारतीय असून ३ श्रीलंकेचे नागरिक आहेत. या १६ जणांमध्ये तीनजण क्रु मेंबर्स (जहाजावरील कर्मचारी) आहेत. जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे १६ जण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. बुडलेल्या या जहाजावरील लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. यावेळी जहाजावर एकूण १६ लोक कार्यरत होते यामध्ये कोकणातील सम्रान इब्राहिम सय्यद हा देखील सहभागी होता. Oil Tanker sunk in the sea
कंपनीच्या माध्यमातून या अपघाताची माहिती सम्रानच्या कुटुंबियांना मंगळवारी देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक मंडळी सातत्याने कंपनीच्या संपर्कात आहेत. मात्र, अजूनही कोणीही सापडले नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शोधकार्य सुरू असल्याची माहिती कंपनीकडून कुटुंबीयांना देण्यात आली आहे. सम्रान हरहून्नरी तरूण असून तो २ महिन्यापूर्वीच गावी गेला होता. जहाजावर कामासाठी निघून गेल्यानंतर तो नेहमी नातेवाईकांशी संपर्कात होता. जहाज बुडाल्याच्या वृत्ताने कसबा परिसरात अनेकांना धक्का बसला आहे. कुटुंबियांसह काही कोकणातील नागरिक ओमानमधील जे जहाज आहे, त्या कंपनीच्या व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क करून या बेपत्ता झालेल्या युवकासंबंधी काही माहिती मिळते का याचा प्रयत्न करत आहेत. Oil Tanker sunk in the sea
१५ जुलैला तेलाचा टँकर उलटल्याची बातमी आली. यानंतर १६ जुलैला ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने याबद्दलची सविस्तर माहिती दिली. कोमोरोसचा ध्वज असलेल्या टँकरचं नाव प्रेस्टिज फाल्कन आहे. त्यावर एकूण १६ जण आहेत. त्यातील १३ कर्मचारी भारतीय असून बाकीचे तिघे श्रीलंकेचे आहेत. तेलाचा टँकर बुडाला आणि मग तो उलटला. यानंतर सगळे सदस्य बेपत्ता झाले. त्यांचा शोध सुरु आहे. पण अद्याप तरी कोणाचाही शोध लागलेला नाही. ओमानच्या प्रशासनाकडून शोधकार्य सुरु आहे. पण अद्याप तरी या शोधकार्याला यश आलेलं नाही. सागरी सुरक्षा विभागाची मदतही शोधकार्यात घेतली जात आहे. Oil Tanker sunk in the sea