• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

by Mayuresh Patnakar
June 14, 2021
in Old News
18 0
1
गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अजय चव्हाण :  नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील

गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आज प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार झालेली नाही. तवंगाची काही नमुने तपासासाठी न्यावे लागतील. त्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरले अशी प्रतिक्रिया अजय चव्हाण यांनी व्यक्त केली.
Oil slicks have been found in four areas on the coast of Guhagar. A similar Oil slick was seen eight days ago. Today, the Maharashtra Pollution Control Board Officer Ajay Chavan told, we have not received any complaint in this regard. Some samples of Oil Slick will have to be taken for testing. Only then did it become appropriate to talk about it.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर बाजारपेठ ते वरचापाट मोहल्ला या परिसरात चार ठिकाणी तेलाचा तवंग असलेल्या लाटा पहायला मिळत आहे. आठ दिवसांपूर्वी केवळ वरचापाट परिसरातील एकाच भागात या लाटा दिसत होत्या.  यावेळी तेलाच्या तवंगाचे प्रमाणही जास्त आहे.
याबाबत तहसीलदार सौ. लता धोत्रे  म्हणाल्या की, स्थानिकांकडून या विषयाची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर प्रदुषण मंडळाला या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) चिपळूण कार्यालयातील अधिकारी अजय चव्हाण म्हणाले की, आठ दिवसांपूर्वी एकदा याबाबत चर्चा ऐकली होती. हा तवंग कशामुळे येतो याची माहिती घेतली पाहिजे. मागे तवंग आला तेव्हा आम्ही चौकशी केली. त्यावेळी आरजीपीपीएल व्यवस्थापनाला कळवले होते. मात्र कोणतीच तक्रार न आल्याने हा विषय थांबला. आता पुन्हा तवंग येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळही या विषयात बोलणे झाले आहे. तवंगचे नमुने तपासणीसाठी नेल्यानंतरच त्याच्या अहवालातून हा तवंग ऑईल, ग्रीस किंवा अन्य कोणता आहे ते समजेल. त्यानंतर तो कोठून आला याचीही माहिती घ्यावी लागेल. जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर असा तवंग आढळत आहे का याची माहिती घेण्यास आम्ही सुरवात केली आहे. त्यानंतरच याबाबात कोणती कार्यवाही करायची हे ठरवता येईल.

Tags: BeachBreaking NewsGuhagarGuhagar BeachGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharashtra Pollution Control BoardMarathi NewsMPCBNews in GuhagarNews in MarathiOil SlickOil SpillPollutionऑईलगुहागर समुद्रकिनाराटॉप न्युजतवंगताज्या बातम्याप्रदुषणब्रेकिंग न्युजमराठी बातम्यामहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युजसमुद्रकिनारा
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.