कोकण पदवीधर उमेदवारी वैभव खेडेकर यांना जाहीर करावी; मनसैनिकांची मागणी
गुहागर, ता. 10 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे. राज्यातील चार मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. Office bearers will meet Thackeray
कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीकडून यावेळेस मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खडेकर यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी करताना यासंदर्भात कोकणातील प्रमुख मनसेचे पदाधिकारी लवकरच मुंबईत जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वैभव खेडेकर हे मनसेचे कोकणातील फायर ब्रँड नेते आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कामांमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा असतो. कोकणातील अनेक महत्त्वांच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक होत लोकांना न्याय दिला आहे. सुशिक्षित तरुणांमध्ये तसेच सुशिक्षित वर्गामध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीचा मोठा ठसा पाहायला मिळतो. Office bearers will meet Thackeray
वैभव खेडेकर यांनी विद्यार्थी सेनेमधूनच राजकारणात प्रवेश केलेला आहे ते पदवीधर आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेपासून काम करत असताना कोकणात तरुणांची मोठी फळी त्यांनी तयार केली कोकणातील स्थानिक पातळीवरती वैभव खेडेकर यांच्या कर्तुत्वाचा कार्याचा आणि समाजसेवेचा हात इतर कोणीही धरू शकत नाही. कोकणात अशी एकही व्यक्ती नाही जी वैभव खेडेकर या व्यक्तिमत्त्वाला ओळखत नाही. त्याच्यामुळे माहितीला या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशरथ पाठिंबा दिला आता कोकण पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने वैभव खडेकर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. Office bearers will meet Thackeray