रत्नागिरी, ता. 23 : विविध सुगंध, सुगंधी द्रव्य, गुणधर्मांचे व वापराचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. याचे अनेक संदर्भ ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद यामध्ये आलेले आहेत. रामायण, महाभारतामध्येही सुगंधी तेलाचे उल्लेख आहेत. कौटिलीय अर्थशास्त्रात चंदन, अगरु आणि कालिकापुराणातही पाच प्रकारचे सुगंध, सहा प्रकारचे धूप, काजळाचे सहा प्रकार याविषयी माहिती आहे. गेल्या हजारो वर्षांपासून भारतामध्ये सुगंधी द्रव्ये, अत्तरे बनवली जात असून आज यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. संकेत पोंक्षे यांनी केले. Odorology has been known since ancient times
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमावेळी त्यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. पोंक्षे यांनी गंधशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यांनी सांगितले की, सुगंध बनवणाऱ्या, द्रव्यांचा व्यापार करणाऱ्या लोकांचा गान्धिक म्हणजे गांधी असा वर्ग तेव्हा तयार झाला होता. सुगंधाच्या व्यापारात शंभर पटीने जास्त फायदा मिळत होता. बाराव्या शतकात साहित्यिक गंगाधर याने गंधसार या ग्रंथात गंधशास्त्राविषयी विस्तृत माहिती दिली आहे. परिभाषा, प्रयोग, परीक्षा आदी तीन विभागात हा ग्रंथ आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी डॉ. पोंक्षे यांचा सत्कार केला. Odorology has been known since ancient times
सिंथेटिकचा वापर वाढला
आज बाजारामध्ये सिंथेटिक सुगंधांचा व्यापार वाढला आहे. कस्तुरी दुर्मिळ आहे. खऱ्या कस्तुरीचा सुवास आपण घेऊ शकत नाही. ती कस्तुरी नाकाजवळ नेल्यास नाकातून रक्तस्राव सुरू होतो. मागणी वाढल्याने कस्तुरीला पर्याय म्हणजे कस्तूरी भेंडी, जवादी कस्तुरीचा वापर केला जातोय. अगरु हा मौल्यवान वृक्ष आहे. नखी म्हणजे समुद्री शिंपल्याचा वापरही केला जातो. अत्तर या शब्दाचे मूळ पर्शियन भाषेत सापडते. सुगंध, सुवासिक द्रव्य असा त्याचा अर्थ होतो. प्राचीन काळात भारताबरोबर इजिप्त, इराणमध्ये सुगंधी पदार्थांच्या निर्मितीवर भर दिला जात होता. Odorology has been known since ancient times
गन्धवाद ग्रंथात उदबत्तिचा उल्लेख
उदबत्तीसाठी बांबूच्या काड्या वापरू नयेत, असे ज्ञान सोशल मीडियावरून दिले जाते. परंतु तेराव्या शतकातील गन्धवाद नावाच्या एका ग्रंथात आढळला आहे. या ग्रंथात श्लोक मराठी टिकेसह आहेत. त्यात वातींची माहिती सांगताना अथ उदबत्ति असा उल्लेख आहे. उदबत्तीसाठी कवड्या ऊद, चंदन, अगरु, धूप वृक्षाचा डिंक, अंबर, लवंग, शिलारास यांचे मिश्रण करण्यास सांगितले आहे. काडी घालूनन वातीसारखे वळावे म्हणजे उदबत्ती तयारी करावी, पण बांबू वापरू नये असे यात कुठलाही उल्लेख नसल्याचे डॉ. पोंक्षे यांनी स्पष्टपणे सांगितले. Odorology has been known since ancient times