बाळ माने; आयुष्यमान भारत कार्डासाठी मदतीचे आवाहन
रत्नागिरी, ता. 03 : दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींनी शहरातील जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णांलयांमध्ये रुग्णमित्र म्हणून काम करावे. रुग्णांची आस्थेने चौकशी करा, समस्या जाणून घ्या. ज्यांना गरज आहे, त्यांना मदत मिळण्याकरिता हे करणे आवश्यक आहे. याचा दर महिन्याला आढावा घ्या. आरोग्य विभागातून आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेऊन गरजूंना हे कार्ड काढून द्या, गरिबांचे काम करा, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तथा माजी आमदार तथा बाळासाहेब माने यांनी केले. Nursing students should become patient friends
नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी बाळासाहेब माने यांचे वडिल स्व. यशवंतराव माने यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब माने म्हणाले की, महिन्यातून एकदा तरी हॉस्पीटलला भेट द्या. म्हणजे रुग्णांचे किंवा नातेवाइकांचे दुःख कळेल. आयुष्यमान भारतचे कार्ड किती लोकांना मिळाले आहे, याची माहिती घ्या. समाजात याबाबत उदासिनता दिसते. नोकरदारांना ऑफिसकडून मेडिक्लेम मिळतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु सर्वसामान्यांना आयुष्यमान भारतचे कार्ड मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु रुग्णांना खरोखर सुविधा मिळतात का, याकडे मिशन म्हणून लक्ष घ्या. आपल्या ४०० विद्यार्थ्यांनी अर्धा तास वेळ द्यावा. Nursing students should become patient friends
बाळ माने पुढे म्हणाले की, आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळाले पाहिजे. १४० करोड भारतीयांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. डॉक्टरांना लागणाऱ्या सहाय्यकांची निर्मिती व्हायला हवी. तंत्रज्ञ, फिजिओथेरपी, वेलनेस सेंटर सुरू करण्याकरिता दि यश फाउंडेशनचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्याप्रमाणे वेलनेस सेंटरमुळे माणूस आजारी पडू नये याकरिता प्रयत्न होतील. आहार, विहार, व्यायाम केला पाहिजे. सध्या डायबेटिस, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरच्या रुग्णांची संख्या वाढतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमही दर महिन्याला सर्वांनी ऐका. Nursing students should become patient friends
यावेळी यशवंतराव माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. वडके, सौ. वडके, सौ. शारदा इंगवले, हेमचंद्र माने, मिहिर माने, विराज माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, गायत्री सावंत आदी उपस्थित होते. तसेच यशवंतराव माने माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पाचकुडे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक घवाळी, सौ. मुळ्ये यांनी यशवंतराव माने यांच्या कार्याविषयीची माहिती दिली. या कार्यक्रमात डॉ. वडके यांनी विद्यार्थ्यांशी आरोग्य, व्यायाम,अभ्यास अशा विविध विषयांवर संवाद साधला. Nursing students should become patient friends