गुहागर, ता. 25 : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार होत असतानाच गुहागर मतदार संघात महायुतीतून भाजपा की शिवसेना अशी चढाओढ असतानाच आज भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी निवडणूक अर्ज घेतल्याने मोठे ट्विस्ट आले आहे. Nilesh Surve Will file nomination form
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५ विधानसभा मतदारसंघांपैकी गुहागर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी महायुतीतून लढण्यास प्रबळ दावेदार असताना हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे जाण्याची हालचाली जोरदार वेग घेत होत्या. याच पार्श्वभूमीवर कालच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कोकणचे पालक रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी येथे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकही जागा लढवण्यास मिळणार नाही का ? याची खंत व्यक्त करत गुहागर मतदारसंघ हा महायुतीतून कमळ निशाणी वरती भारतीय जनता पार्टीला लढवण्यास मिळावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली होती. आणि आज भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुक्याचे एकनिष्ठ,अभ्यासू आक्रमक, युवा नेतृत्व तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी निवडणूक अर्ज घेतल्याने या विधानसभा मतदारसंघातील रंगत आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Nilesh Surve Will file nomination form


महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांनी आज अर्ज दाखल केला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तालुका संपर्कप्रमुख प्रमोद गांधी हे अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीतून कोण उमेदवार याबाबतची अजूनही निश्चितता नसल्याने उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र या पार्श्वभूमीवर निलेश सुर्वे यांनी आज उमेदवारी अर्ज घेतल्याने गुहागर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. गुहागर विधानसभेतली निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी होणार याबाबत अनेक चर्चासत्र घडत आहेत. निलेश सुर्वे हे गेली 22 वर्ष भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. भंडारी समाजातील निलेश सुर्वे हे ओबीसीतील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीतील एक विकसनशील नेतृत्व म्हणून राजकीय पटलावर विकसित होत आहेत. अभ्यासू,आक्रमक, स्पष्टवक्ते आणि सर्वसामान्यांशी जनसंपर्क असणारा उमदा तरुण म्हणून सर्वसमावेशक दृष्टीने निलेश सुर्वे यांच्याकडे विधानसभा मतदारसंघातून पाहिले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात घडलेले निलेश सुर्वे पक्षाच्या मुशीत घडलेले असतानाही समाजातील सर्व जाती धर्मामध्ये आपली छाप पाडणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी घेतलेल्या निवडणूक अर्ज बाबत चर्चाना उधाण आले आहे. Nilesh Surve Will file nomination form