स्व. रामभाऊ बेंडल आदरांजली सभेत कुणबी समाजोन्नती संघ तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांचा निर्धार
गुहागर, ता. 25 : कुणबी या बहुजन समाजाच्या विविध मागण्यांना आवाज उठविण्यासाठी विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधीत्व नाही. यासाठी आपल्याला बदल घडविण्यासाठी गुहागरचा पुढील आमदार हा कुणबी समाजाचाच असला पाहिजे असा निर्धार लोकनेते स्व. रामभाऊ बेंडल यांच्या ३० व्या आदरांजली सभेत करण्यात आला. Next MLA of Guhagar belongs to Kunbi community
लोकनेते माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांच्या ३० व्या स्मृतीदिनानिमित्त शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवनमधील स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. स्व. रामभाऊ बेंडल यांच्या स्मृती जागविताना त्यांच्या प्रत्येक कार्याचा आढावा मान्यवरांनी घेतला. गुहागरच्या एसटी स्टँडपासून ते गावागावातील रस्ते, मोडकाघर धरण, शैक्षणिक संस्था, छात्रालये आदींची उभारणी ही लोकनेते रामभाऊ बेंडल यांनी केल्याचे सर्वांनी उपस्थितांसमोर मांडले. Next MLA of Guhagar belongs to Kunbi community
कुणबी समाजोन्नती संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांनी यावेळची विधानसभा ही आपल्या समाजाचाच उमेदवार असेल अशाप्रकारचा ठराव पारीत केला. ते म्हणाले, समाज संघटना म्हटली की, लोकप्रतिनिधी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्याला खोकला करण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या कुणबी समाजामध्ये सगे-सोयरे अंतर्गत सरसकट कुणबी दाखले देण्याचा घाट घातला गेला आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनातून कुणीही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविलेला नाही. ६० ते ७० टक्के कुणबी समाज असलेल्या या समाजाची ही अवस्था असेल तर आपल्याला आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची गरज आहे. यासाठी सर्वानी संघटीत होऊन प्रत्येक गाव, वाडीपर्यंत यापुढील आमदार कुणबी समाजाचाच निवडून आणावयाचा आहे, असा संदेश न्यावयाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. Next MLA of Guhagar belongs to Kunbi community
समाज नेते रामचंद्र हुमणे यांनी आजही आपल्या समाजाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. आतापर्यंत जे जे घडले ते त्या त्या परिस्थितीनुसार करणे भाग होते. आतापर्यंत आपण इतरांना सहकार्य केले. परंतु जेव्हा समाजावर वेळ येते तेव्हा आपल्याला संघटीत होऊन आपल्या हक्काचा माणूस विधानसभेवर पाठविण्यासाठी यावेळची आमदारकी लढवायचीच असा संकल्प आज आपण करुया असे आवाहन त्यांनी कुणबी बांधवाना केले. Next MLA of Guhagar belongs to Kunbi community
माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी बेंडल साहेबांचे कार्य मी जवळून पाहिले आहे. मी राजकारणात पडलो ते त्यांच्या प्रेरणेने. अनेकवेळेला त्या त्या भूमिकेतून आपण गेलो आहोत. परंतु आपले प्रश्न सोडविणार कोण याचे उत्तर आपल्याला शोधून काढण्याची वेळ आज आली आहे. केवळ नावलौकीक मिळविण्यासाठी आपण विधानसभा लढवायची नसून आपले अनेक प्रलंबित प्रश्न व बहुजनांच्या विकासासाठी यावेळी हक्काचा आमदार निवडून आणावयाचा असल्याचे सांगितले. Next MLA of Guhagar belongs to Kunbi community
यावेळी व्यासपीठावर मुंबई शाखेचे अध्यक्ष कृष्णाजी वणे, रामचंद्र हुमणे, राजेश बेंडल, सरचिटणीस प्रदीप बेंडल, गुहागर मुस्लीम समाज संघटनेचे अध्यक्ष साबीर साल्हे, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, गणपत पागडे, चंद्रकांत पागडे, तुकाराम निवाते, सुधीर टाणकर, विलास वाघे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. Next MLA of Guhagar belongs to Kunbi community