पर्यटन उद्योगामुळे गुहागर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वेगाने होऊ लागले. सुरवातीचे जागांचे व्यवहार गुंतवणुकीसाठी, कोकणात हक्काचे घर हवे म्हणून झाले. त्याचबरोबर शेती बागायतीसाठी जमीन खरेदी करण्याचा कल वाढु लागला. त्यातूनच सेंद्रिय शेती (Organic Farming), आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology), गुहागरमध्ये दाखल झाले. आज तालुक्याबाहेरील लोकांनी गुहागरमध्ये 50 हेक्टर क्षेत्र नव्याने लागवडीखाली आणले आहे. स्वाभाविकपणे यातून रोजगार निर्मितीही झाली आहे. कृषी विकासाचा हा नवा ट्रेंड गुहागरमधील वृक्षसंपदा वाढविण्यासाठी उपयोगी आहे. मात्र त्यासोबतच जैवविविधतेचा ऱ्हास होणार नाही याची काळजीही कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना वाटु लागली आहे. New Trend in Farmer
50 हेक्टर जमीनीवर फळबाग
गुहागर तालुक्यात पर्यटन उद्योगाच्या वाढीबरोबर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही वाढले. सुरवातीला सेकंड होमसाठी, गुंतवणूक म्हणून समुद्रकिनारा (beach) दिसेल अशा जागांची खरेदी मुंबईकर, पुणेकर करत होते. त्यातूनच पुढे बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी करुन त्यात अकृषिक (एन.ए.) प्लॉट विकसीत केले. काहींनी टाऊनशीप बांधल्या. या प्रवाहाबरोबरच पुन्हा गावाकडे येवून किंवा पडीक जमीन विकत घेऊन तेथे फळबागांची लागवड करण्याचा नवा ट्रेंडही सुरु झाला आहे. आज तालुक्यात सुमारे 50 हेक्टर जमीनीवर तालुक्याबाहेरील लोकांनी फळबागा विकसीत केल्या आहेत. New Trend in Farmer
रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून तीन वर्ष टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली. ही योजना स्थानिकांसाठी लाभदायक ठरली. अनेक ग्रामस्थांनी स्व मालकीच्या पडीक जमीनीवर आंबा, काजू लागवड सुरु केली. गुहागर तालुक्यात आज 1513 हेक्टर पडीक जमीन लागवडी खाली आली आहे. यामध्ये मुख्यत्वे आंबा, काजू, नारळ, सुपारी यांची लागवड झाली आहे. New Trend in Farmer
याशिवाय गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी पुन्हा गावाकडे येवून किंवा जागा खरेदी करुन त्यावर फळबाग लागवड करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. तालुक्यातील गिमवी, मुंढर, झोंबडी, मढाळ, पाली, कौंढर काळसुर, मढाळ, पाटपन्हाळे, तळवली, चिखली, सुरळ या पट्ट्यात लागवडीचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 10 वर्षात पर्यटन व्यवसाय वाढला. गुहागर विजापूर महामार्ग झाला. मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. त्यामुळे येथील जमीनींचा भाव वाढला. तेव्हा स्थानिकांनी जमीनीची विक्री करुन पैसा मिळवला.
याच जमिनी खरेदी करुन त्या पुन्हा लागवडीखाली आणण्याचे काम नवे जागा मालक करत आहेत. त्याचबरोबर नोकरी उद्योगासाठी गाव सोडून शहरात गेलेल्यांनी पुन्हा आपल्या जमीनीत लागवड केली. आज गुहागर तालुक्यात अशी सुमारे 50 हेक्टर जमीन लागवडीखाली आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी नारळ, सुपारी, आंबा, काजुबरोबरच हळद, कलिंगड, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट, कंद (Turmeric, kalingad, strawberry, dragon fruit, tuber) पिकांची लागवड सुरु केली आहे. New Trend in Farmer
रोजगारनिर्मितीबरोबर तंत्रज्ञानाचा प्रसार
जागा मालक नवे असले तरी त्या जमीनीत प्रत्यक्ष काम करणारा स्थानिकच असतो. स्वाभाविकपणे लागवडीबरोबर रोजगार निर्मितीही होते. नवे शेतकरी बहुतांशवेळा शहरातील असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा वापर लागवडीच्या सुरवातीपासूनच सुरु करतात. त्याचा परिणाम म्हणून आजुबाजुचे शेतकरीही या तंत्रज्ञानाचा वापर करु लागतात. त्यामुळे रोजगार निर्मितीबरोबरच तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसारातही नव्याने शेती करु लागलेल्या जागामालकांचा मोठा वाटा आहे. New Trend in Farmer
नवे शेतकरी आपल्या जागेच्या कृषी विकासासाठी कामगार, व्यवस्थापक आदी मनुष्यबळासाठी स्थानिकांना प्राधान्य देतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिकांना रोजगार दिल्यामुळे निवास, भोजन यासह अन्य व्यवस्थांचा खर्च वाचतो. शिवाय गावाशी सौहार्दपूर्ण संबध प्रस्थापित होतात. स्वाभाविकपणे रोजगारनिर्मिती होते. आज 50 हेक्टर जमीन लागवडी खाली येताना सुमारे 72 स्थानिकांना कायमस्वरुपी रोजगार (Employment) मिळाला आहे. याशिवाय इलेक्ट्रीशियन (Electrician), पंप विक्री व दुरुस्ती करणारे, ठिबक सिंचन व्यवस्था स्स्थापित करणारे, खते – बी बियाणे विक्रेते आदींना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. New Trend in Farmer
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा, यंत्रसामुग्रीचा वापर आणि प्रसारात नव्या शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आपल्याकडे पारंपरिक बी बियाणे वापरण्याची पध्दत आहे. पिढ्यानपिढ्या कोणती लागवड करायची, कोणती खते द्यायची हे ठरलेले आहे. ही चाकोरी सोडून वेगळा विचार करण्याची मानसिकता यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांची नव्हती. परंतु त्याच्या शेजारी जागा घेतलेला नवा मालक कृषी तंत्रज्ञाच्या सांगण्यानुसार पिक घेतो. दरवर्षी पिकात बदल करतो. बी-बियाण्यातही चोखंदळ आहे. नांगरणीसाठी पॉवर ट्रीलर, फवारणीसाठी इंधनावर चालणारा पंप वापरतो. पाणी शिंपण्यासाठी पाटाऐवजी सुरवातीपासून ठिबक सिंचनची व्यवस्था बसवतो. हे सर्व स्थानिकांनी जवळून अनुभवले. त्यामुळे त्याचा फायदा लक्षात आला. New Trend in Farmer
याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरवेलीत शेखर विचारे यांनी त्यांच्याकडील आंब्यावर एक्सपोर्टसाठी असलेली सर्व प्रक्रिया केली. वेगवेगळ्या शहरात कुरियरने आंबा विक्री केली. याची सुरवातील चेष्टा झाली. मात्र या प्रक्रियेमुळे आंबा खराब होत नाही. थेट ग्राहकापर्यंत आंबा पोचविल्याने व्यवसाय वाढतो. हे लक्षात आल्यावर स्थानिक बागायतदारांनीही थेट ग्राहकापर्यंत आंबा पोचविणे सुरु केले. कोरोना महामारीमुळे ही व्यवस्था चटकन स्थिरावली. New Trend in Farmer
कृषी विकासासमोर वणवे, वन्य प्राण्यांचे आव्हान
फळबाग लागवड योजनेमध्ये लावलेली झाडे टिकविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यासमोर आहे. दरवर्षी लागणारे वणवे आणि वन्य प्राण्यांमुळे झाडांचे नुकसान होते. फलोत्पादनानंतर डुक्कर, वानर आणि माकडांपासून पिकाचे संरक्षण करावे लागते. ही आव्हाने समोर असतानाच एकाच पिकाच्या लागवडीमुळे जैव विविधता धोक्यात येण्याची भिती कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. New Trend in Farmer
रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवड योजनेची अंमलबजावणी आग्रहाने होत आहे. त्याचबरोबर नव्याने पडीक जमीनींचा कृषी विकासही वेगाने होत आहे. या लागवडीमध्ये प्रामुख्याने आंबा आणि काजु या नगदी पिकांचा समावेश आहे. काही ठिकाणी नारळ, सुपारीची लागवड झाली आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आज तालुक्यातील 1553 हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आहे. मात्र या क्षेत्रातील लागवड टिकविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. New Trend in Farmer
गीमवी, देवघर, मुंढर, झोंबडी या परिसरात दरवर्षी वणवे जातात. पडीक जमीनीतील वाळलेल्या गवतामुळे लागणारे हे वणवे माळरानावरील वेगवान वाऱ्यांनी 4 ते 5 किलोमिटरपर्यंत पसरतात. येथील स्थानिक जनतेला दरवर्षी घराभोवतीचा 10 फुटापर्यंतच परिसर स्वच्छ करुन ठेवण्याची सवय जडली आहे. शेतकरी (farmer), बागायतदारही दिवाळीनंतर आपल्या शेत जमीनीतील सर्व गवत नष्ट करतात. तरीही बाजुने गेलेल्या वणव्या धगीने झाडे होरपळतात. याशिवाय रानरेडे, नीलगायी, गवे यापासून झाडांचे संरक्षण करावे लागते. हे वन्यप्राणी कळपाने बागेत घुसले की एकाबाजुने झाडे ओरबड्यास सुरवात करतात. या प्राण्यांना हुसकावुन लावण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. New Trend in Farmer
या सर्व संकटातून वाढलेली झाडे उत्पादन देवू लागली की वानर आणि माकडांचा त्रास सुरु होतो. वानरांना बंदुकीचा धाक दाखवला की ते पळून जातात पण माकडे आजुबाजुला लपून बसतात. शेतकरी दुसऱ्या कामात गुंतला की पुन्हा येतात. माकडे संख्येने जास्त असली तर माणसावर हल्ला करायला धावुन येतात. ही संकटे समोर दिसत असताना आता कृषी विभागाकडून जैव विविधतेला धोका पोचत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच प्रकारच्या लागवडीमुळे त्या परिसरातील जैव विविधता (Biodiversity) नष्ट होते. त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. याशिवाय पिकावर एखादा रोग आला तर वेगाने पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते. असा रोग आटोक्यात आणणे कठीण बनते. New Trend in Farmer
नव्या दमाच्या शेतकऱ्यांना ही सर्व आव्हाने पेलून, शेती बागायतीच्या जमाखर्चाचा ताळमेळ जुळवावा लागतो आहे. यामध्ये ते कसे यशस्वी होतात, कोणत्या उपाययोजना करतात याकडेही स्थानिक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. New Trend in Farmer
प्रतिक्रिया
तालुक्यात गेल्या चार पाच वर्षात मुंबईतून परत गावात येवून किंवा गावाकडची जमीन विकत घेवून त्यामध्ये फळबाग लागवड करण्याचा ट्रेंड वाढतोय. नारळ, आंबा आणि काजू लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे नवे जागा मालक आमच्या कंपनीचे भागीदार होण्यासही उत्सुक आहेत. आम्ही 15 ते 20 जणांना शेअर्स दिले आहेत. ही संख्या पुढील काळात दुप्पट होणार आहे. New Trend in Farmer
– मंदार जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनी
नव्याने जागा विकत घेणारा तंत्रस्नेही असतो. विविध ठिकाणी होणारे प्रयोग, त्यांचे फायदे तोटे समजून घेतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो गुंतवणूक करत असल्याने शेतीकडे उद्योग म्हणून पहातो. त्याचा हिशोब ठेवतो. मार्केटींगची प्रभावी व्यवस्था उभी करतो. या सर्व गोष्टी स्थानिक शेतकऱ्यांनी केल्या तर नुकसान कमी करता येऊ शकते. New Trend in Farmer
– मिलिंद गाडगीळ, कृषी अभ्यासक
जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी साधे, सोपे सुत्र कृषी विभाग (Department of Agriculture) नेहमीच शेतकऱ्यांना सांगतो. आंबा (Mango), काजू (cashew nut), नारळ (coconut), सुपारी (betel nut) यासारख्या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करताना त्यामध्ये कंदवर्गीय, मसाल्याचे आंतरपिक घ्यावे. कुंपणाला कोकम, हरडा, बेहडा, किंजळ, अर्जुन अशी झाडे लावावीत. याशिवाय सुगंधी, आकर्षक फुलझाडे परिसरात लावावीत. जेणेकरुन विविध प्रकारचे किटक (Insects), पक्षी (birds), फुलपाखरे (butterflies), लागवड क्षेत्रात रहातील. त्याचा परागीभवनाला फायदा होईल. आंतरपिकांमुळे मातीचा पोत टिकेल. New Trend in Farmer
– अमोल क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी
Tags- गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Biodiversity, Insects, birds, butterflies, आंबा, Mango, काजू, cashew nut, नारळ, coconut, सुपारी, betel nut, Department of Agriculture, मार्केटींग, Marketing, Organic Farming, Modern Technology, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, beach, Turmeric, kalingad, strawberry, dragon fruit, tuber,Employment, रोजगार, farmer, शेतकरी, इलेक्ट्रीशियन, Electrician, New Trend in Farmer