• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

छोट्या गोष्टीसाठी राजकारण करणे हे घाणेरडी प्रथा

by Ganesh Dhanawade
April 29, 2025
in Guhagar
105 1
0
New bus inauguration ceremony at Guhagar Agar
207
SHARES
591
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव;  गुहागर आगारासाठी मंजूर नविन बस लोकार्पण सोहळा

गुहागर, ता. 29 : आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर आगारासाठी मंजूर केलेल्या एकूण दहा गाड्यांपैकी नविन पाच एस्.टी.बस प्रवाशांच्या सेवेसाठी गुहागर आगार येथे दाखल झाल्या आहेत. आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आ. जाधवांनी स्वतः बसचे स्टेरिंग हातात घेऊन प्रवाशांसह आपल्या कार्यकर्त्यांना नव्या बस मधून फेरफटका मारला. एस.टी ट्रायल म्हणून डेपो बाहेर चालविण्याची इच्छा होती. परंतु मी एस.टी. चालवली म्हणून कारणाशिवाय डेपो मॅनेजरला जाब विचारला गेला असता की, आमदार एस.टी गाडी बाहेर कशी काय चालवू शकतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राजकारण करणे हे घाणेरडी प्रथा पडलेली आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ लोकार्पण म्हणून मी एस.टी. डेपोच्या आवारात गाडी चालविली, असे जाधव म्हणाले. New bus inauguration ceremony at Guhagar Agar

रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक डेपोला नवीन गाड्या मिळाल्या. परंतु गुहागर डेपोला नवीन बस मिळाली नव्हती. मध्यंतरी मी परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांना भेटलो. विरोधी पक्षाचा मतदारसंघ आहे म्हणून सरकारने न बघता शेवटी विरोधी पक्षाचा मतदारांना सरकार सुद्धा अनेक सुविधा देतात म्हणून गुहागर डेपोला सुद्धा नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत अशी मी मागणी केली. गुहागर तालुक्याला एसटी शिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नाही. येथील लोकांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागतो. इथे रेल्वेची सोय नाही. हायवे नसल्याने बाहेरून कुठून येणाऱ्या गाड्या नाहीत. म्हणून गुहागर आगाराला नवीन गाड्यांची आवश्यकता आहे. २५  ते ३० वर्षांपूर्वी एसटीतून मी प्रवास करत होतो. त्यावेळी एसटीच्या चालकाला उलटी जुलाब सुरू झाले. जवळजवळ तो बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला गाडी चालवणं मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस मी चिपळूण पर्यंत आणली होती. एस.टी ट्रायल म्हणून डेपो बाहेर चालविण्याची इच्छा होती. परंतु मी एस.टी. चालवली म्हणून कारणाशिवाय डेपो मॅनेजरला जाब विचारला गेला असता की, आमदार एस.टी गाडी बाहेर कशी काय चालवू शकतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राजकारण करणे हे घाणेरडी प्रथा पडलेली आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ लोकार्पण म्हणून मी एस.टी. डेपोच्या आवारात गाडी चालविली, असे जाधव म्हणाले. New bus inauguration ceremony at Guhagar Agar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNew bus inauguration ceremony at Guhagar AgarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.