गुहागरात आ. जाधव यांचे काम करण्यास कार्यकर्त्यांचा नकार
गुहागर, ता. 09 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच महविकास आघाडीत सहभागी असलेले गुहागर मतदार संघाचे आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काम करावे लागेल म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप व शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात प्रवेशाची प्रक्रिया होणार असल्याचे बोलले जात आहे. NCP workers are preparing to join BJP
राज्यात शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेले आहे. राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदार, खासदार आणि राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गटाला अधिक पसंती दिली आहे. गुहागर तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटासोबत राहिले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही जुने पदाधिकारी व कार्यकर्ते राहिले आहेत. NCP workers are preparing to join BJP
या फुटिनंतर शरद पवार यांच्या गटाने घेतलेल्या बैटकीत अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतील घटक म्हणून आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नाराजी व्यक्त केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराच्या विरोधात आपण काम केले. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी संपवू पाहणाऱ्या आमदारांसोबत काम केल्यास उरली सुरलेली राष्ट्रवादी देखील संपून जाईल, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. शरद पवार गटातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. परंतु, आता निवडणुकांची चाहूल लागल्याने प्रत्येक जण आपली भूमिका स्पष्ट करू लागले आहेत. काहींनी भाजप मध्ये प्रवेश करून पदे स्वीकारली आहेत. तर येत्या काही दिवसात शरद पवार गटातील बहुतांशी पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची तयारी केली आहे. NCP workers are preparing to join BJP