गुहागर, ता. 02 : शहरातील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत श्री वराती मंदिर खालचा पाट येथे साजरा होणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Navratri Festival of Varati Devi
यामध्ये नित्य कार्यक्रम म्हणून सकाळी 7 वाजता श्री वराती देवीची षोडषोपचारे पूजा, सायंकाळी 7.15 मिनिटांनी देवीची आरती व प्रसाद असे कार्यक्रम असणार आहे. तसेच दररोज कर्तबगार मातेला राजमाता जिजाऊ सन्मान देण्यात येणार आहे. यामध्ये ज्योती अशोक देवकर, निर्मला लक्ष्मण जैतापकर, मनीषा मंगेश कदम, शुभदा सुभाष नार्वेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. Navratri Festival of Varati Devi
नवरात्रौत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता देवीची सहस्त्रनामावली, सायंकाळी 5 वाजता दुर्गा श्री भजन मंडळ वरचा पाट यांचे भजन, रात्री 8 वाजता कांचन स्वामी नृत्य कलापथक असगोली हुंबरवाडी यांचे जाखडी नृत्य, रात्री 10 वाजता स्वयंप्रकाश गोयथळे खालचापाट यांचे भजन,
शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता कुंकू मार्जन, सायंकाळी 4 ते 5.30 वाजता कलावती आई भजन, रात्री 8 वाजता स्वर साधना भजन महिला मंडळ ज्ञानेश्वर यांचे भजन, रात्री दहा वाजता जय बजरंग प्रासादिक भजन मंडळ पिंपळ यांचे भजन,
शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सप्तशती पाठ वाचन, रात्री 8 वाजता कीर्तने नृत्यकला पथक कीर्तन वाडी यांचे जाखडी नृत्य, रात्री 10 वाजता नूतन गोपाळकृष्ण भजन मंडळ जांभळेवाडी यांचे भजन,
रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता कुमारी का पूजन, रात्री 8 वाजता माऊली वरदान देवी कलापथक रानवी यांचे जागरण नृत्य, रात्री 10 वाजता श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ वरचा पाट यांचे भजन,
सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता श्री चंडी हवन, रात्री 8 वाजता श्री वराती देवीचा महाप्रसाद, रात्रो 10 वाजता श्रीदत्त प्रसादिक भजन मंडळ पालशेत यांचे भजन, रात्रो 11 वाजता गंगामाता प्रासादिक भजन मंडळ कोंडकारूळ यांचे भजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नितीन गोयथळे व अजित मोरे या मानकऱ्यानी केला आहे. Navratri Festival of Varati Devi