रत्नागिरी, ता. 01 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्यान आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. National Science Day at Deo, Ghaisas, Kir College
प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. या वर्षासाठी विज्ञान दिनाची संकल्पना विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सक्षम करणे ही आहे. या दिनानिमित्त विज्ञान विभागातर्फे रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्रा. शुभम पांचाळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. विज्ञान शाखेतील सर्व विषयांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून प्रात्यक्षिकांद्वारे यावर्षीचा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. National Science Day at Deo, Ghaisas, Kir College


विज्ञान प्रदर्शनाला कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी व शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शाखेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी भेट दिली. उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, विज्ञान विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, विज्ञान शाखेचे प्राध्यापक, विद्यार्थी, इतर शाखांचे विद्यार्थी इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश रणसे याने केले. आभार प्रा. मिथिला वाडेकर यांनी मानले. National Science Day at Deo, Ghaisas, Kir College