रत्नागिरी, ता. 29 : भारत सरकार व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती आयोजित दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीची निवड या राष्ट्रीय समितीमार्फत करण्यात आली आहे. National Model Teacher Award

रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी रवींद्र भवन, सांखळी, गोवा या ठिकाणी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सौ. आरेकर मॅडम यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार व भारत सरकारचे मा. केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र असे आहे. या पूर्वी त्यांना याच शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या या यशासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहित जाधव सर आणि सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. National Model Teacher Award