जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांचे प्रतिपादन
गुहागर, ता. 30 : तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा चिपळूण यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन चिपळूण तहसीलदार श्री. प्रविण लोकरे याच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. National Consumer Day at Chiplun
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. ग्राहक गीताने सुरुवात झाली. ग्राहक पंचायत चिपळूण शाखेचे अध्यक्ष जगदीश वाघूळदे यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. तालुका सचिव प्रकाश सावर्डेकर यांनी ग्राहकाचे हक्क व कर्तव्य या विषयावर तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी ग्राहक पंच बिंदू व पंच परिवर्तन याविषयावर सखोल मार्गदर्शन करून ग्राहक चळवळ अधिक जोमाने करावी असे आवाहन केले. National Consumer Day at Chiplun


यावेळी नायब तहसीलदार शशिकांत साळुंखे, नायब तहसीलदार वाल्मिक मोरे, नायब तहसीलदार प्रज्ञा परांजपे अव्वल कारकून संज्योती पालशेतकर, अभिजित वाडीकर, कोकण प्रांत सचिव मानसिग यादव, कोकण प्रांत महिला जागरण सदस्या प्रणिता धामणस्कर, संघटन मंत्री नम्रता आग्रे, सदस्य सुहास चव्हाण, अशोक नाखरेकर, पेट्रोल पंम्प जिल्हाध्यक्ष मिलिंद मेहता, गॅस वितरणच्या चितळे, कार्यालयीन कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. विलास सकपाळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रकाश सावर्डेकर यांनी केले. संघटन प्रार्थननेने कार्यक्रमाची सांगता झाली. National Consumer Day at Chiplun