गुहागर, ता. 03 : मुंबई वसई येथे दि. २ मार्च २०२५ रोजी नरवण सनगरेवाडी क्रीडा मंडळाच्या मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश कावणकर, श्री संतोष आलीम आणि मंडळातील इतर मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते उद्धाटन करण्यात आले. Naravane Sangrewadi Cricket Tournament


या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील वाडी मर्यादित २४ संघ सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश धनावडे, श्री विजय गोताड, श्री अनंत मालप आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. स्थानिक मंडळाचे पदाधिकारी खास गावावरून ह्या स्पर्धेसाठी आले होते. प्रथम फेरीचे सर्व सामने ४ षटकांचे आणि पुढील सर्व सामने ३ षटकांचे खेळविण्यात आले. या स्पर्धेत सनगरेवाडी चषक २०२५ चषकाचे मानकरी प्रथम क्रमांक – मितेश ११ सनगरे वाडी, द्वितीय क्रमांक – तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ, आणि तृतीय क्रमांक – निर्मला ११ तवसाळ ठरले. तसेच उत्कृष्ट फलंदाज – सौरभ घाणेकर ( तांबडवाडी तवसाळ), उत्कृष्ट गोलंदाज – स्वप्निल घाणेकर (निर्मला ११तवसाळ ), मालिकावीर – ऋषी गोताड (मितेश ११ सनगरेवाडी ) या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. Naravane Sangrewadi Cricket Tournament


या स्पर्धेला दानशूर व्यक्तींनी सर्व बक्षिसे, पाणी व्यवस्था, स्पर्धेसाठी चेंडू आणि देणगी दिलेल्यांचे मंडळाकडून मनपूर्वक आभार मानण्यात आले. संध्याकाळी बक्षीस वितरण करून स्पर्धेची सांगता करण्यात आली. संपूर्ण स्पर्धा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तसेच शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. Naravane Sangrewadi Cricket Tournament