डॉ. प्रशांत काळे, नितिष गोळे जोडी विजेती तर केदार खरे व विश्वास सोमन जोडी उपविजेती
गुहागर, ता. 04 : गुहागर भारतीय जनता पार्टी युवामोर्चा आयोजित नमो चषक २०२४ डबल बॅटमिंटन स्पर्धेमध्ये झालेल्या अंतिम लढतीमध्ये डॉ. प्रशांत काळे व नितिष गोळे या जोडीने प्रतिस्पर्धी असलेल्या केदार खरे व विश्वास सोमन या जोडीवर दोन सेट नी मात करत अंतिम विजेते पद पटकावून नमो चषकाचे मानकरी ठरले. Namo Cup Badminton Tournament
मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युवकांना खेळामध्ये प्रोत्साहित करण्याच्या हेतूने संपुर्ण देशामध्ये नमो चषकाच्या माध्यमातून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर शहर युवाध्यक्ष मंदार पालशेतकर यांनी डबल बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन गुहागर रंगमंदिर येथे केले होते. यावेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार यांच्या मोलाच्या सहकार्यातून ही स्पर्धा २ मार्च रोजी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन शहराध्यक्ष नरेश पवार आणि कोटचे भुमिपूजन अमित जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. Namo Cup Badminton Tournament
या स्पर्धेमध्ये १) केदार खरे, विश्वास सोमन. २) गौरव वेल्हाल, सर्फराज मालगुंडकर ३) निल खाकम, निरज घरट ४) उत्कर्ष जाधव, मकरंद गाडगीळ ५) दिपक बेणेरे, साईदिप कदम ६) निरज लोखंडे, यश शिर्के ७) हर्षल भाले, पार्थ सोमण ८) कौस्तुभ गद्रे, ओम वेल्हाळ ९) मानस विचारे, अनुज कांबळे १०) सिध्देश कामेरकर, राज साळवी ११) वेदांत कनगुटकर, राज खडपेकर १२ ) आदित्य मारवाडे, यश पाडावे १३ ) यश पालशेतकर, आर्यन अडूरकर. १४) स्मित चव्हाण, सर्वेश बळवंत १५) स्नेह वेल्हाळ, अवधुत वेल्हाळ, १६ ) प्रिती रेवाळे, प्राची घाणेकर १७ )अपर्णा आठवले, स्वप्नाली भाले १८ ) ओम नाटेकर, सक्षम सैतवडेकर १९ ) प्रमोद बोरसे, संदिप पवार २०) प्रशांत काळे निशिष गोळे या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गुहागर शहर सरचिटणिस संतोष सांगळे, सोशल मिडिया प्रमुख अमित जोशी, कोषाध्यक्ष हेमंत बारटक्के, शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, माजी नगरसेवक उमेश भोसले, कौस्तुभ गद्रे, जिल्हा युवाध्यक्ष संगम मोरे, केदार खरे, प्रशांत रहाटे आदि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. Namo Cup Badminton Tournament
सदर स्पर्धेमध्ये उपांत फेरीमध्ये डॉ. प्रशांत काळे, नितीष गोळे (गुहागर ) आणि प्रमोद बोरसे,संजय पवार (दापोली ) यांच्या मध्ये लढत होऊन डॉ. प्रशांत काळे, नितीष गोळे यांनी दोन सेटनी विजय मिळवला तर निर्भय बेणेरे, साईदिप कदम आणि केदार खरे, विश्वास सोमण यांच्यामध्ये लढत होऊन केदार खरे, विश्वास सोमण यांनी दोन सेटनी विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाल्याने प्रेशकांना या स्पर्धेचा आनंद लुटता आला. Namo Cup Badminton Tournament
अंतिम विजेता स्पर्धेकांना नमो चषक आणि ४४४४ रुपये रोख रक्कम आणि उपविजेत्या जोडीला २२२२ रुपये रोख रक्कम व चषक देऊन शहराध्यक्ष नरेश पवार यांच्या हस्ते गौरविण्यात. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. व उपविजेत्या जोडीला युवाध्यक्ष मंदार पालशेतकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे सह तालुकासरटिणिस सचिन ओक, दिनेश बागकर, शार्दुल भावे, श्रीमती श्रध्दा घाडे आदिंनी स्पर्धेठिकाणी भेट देवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या संपुर्ण सामन्यासांठी पंच तसेच नियोजनामध्ये केदार खरे यांनी मोलाची भुमिका बजावली. तर अभिजित गोळे, नितीश मालप, प्रथमेश परांजपे, मंदार वैद्य, राहुल भोसले, स्वानंद दिक्षित, कौस्तुभ गर्दे, हेमंत बारटक्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याने मंदार पालशेतकर यांनी आभार मानले. Namo Cup Badminton Tournament