• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मी वाचनालयातील विभागांचा नामकरण सोहळा

by Manoj Bavdhankar
March 29, 2024
in Guhagar
105 1
0
Naming Ceremony
206
SHARES
589
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वाचन विभागास कै.नाना खरे, महिला विभागास कै.सुलभा खरे, बालविभागास कै. मामावैद्य यांचे नाव

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयामधील वाचन विभाग, महिला विभाग, बाल विभागाचा नामकरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाचन, महिला व बाल विभागाच्या  नामकरण सोहळ्यासाठी  जेष्ठ साहित्यिक इतिहासतज्ञ प्रकाशजी देशपांडे, जेष्ठ उद्योजक श्रीराम खरे, जेष्ठ उद्योजक प्रसाद वैद्य, सुप्रसिद्ध लेखिका नीला नातु  प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. सदर नामकरण सोहळा ज्ञानरश्मी वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला. Naming Ceremony

Naming Ceremony

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या पूजनाने झाली. जेष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या शुभहस्ते गुहागर ज्ञानरश्मी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. नारायण हरी खरे तथा नाना खरे वाचन विभागाचे उदघाटन, लेखिका सौ. नीला विवेक नातु यांच्या शुभहस्ते  कै. सुलभा नारायण खरे महिला वाचन विभागाचे उदघाटन तर उद्योजक प्रसाद वैद्य यांचे शुभहस्ते कै. कमलाकर श्रीधर वैद्य तथा मामा वैद्य बाल विभागाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कु. जान्हवी मायदेव हिने आलेल्या  पाहुण्यांसाठी सुरेल आवाजातील स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्प देऊन स्वागतसन्मान करण्यात आला. या ज्ञानरश्मी वाचनालयासाठी विशेष योगदान देणारे श्रीदेव गोपाळ कृष्ण विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक श्री. शिवाजी आडेकर, उद्योजक सुरेंद्र मर्दा, सेवानिवृत्त शिक्षिका वंदना विश्वास माने यांचा वाचनालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. अनेक पुरस्कार प्राप्त “आरसा” कादंबरीचे लेखक श्री ईश्वरचंद्र हलगरे  “ओघळलेले मोती” व “बाईपणाच्या उंबरठ्यावर” या साहित्य वर्तुळात गाजत असलेल्या पुस्तकांच्या लेखिका प्रा सौ.मनाली बावधनकर, महाराष्ट्रातील पहिल्या कराटे ब्लॅक बेल्टधारक शिक्षिकेचा बहुमान पटकावणाऱ्या व शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षिका सौ. सुलक्षणा राशिनकर, राष्ट्रीय अक्कलकोट भुषण साहित्य रत्न पुरस्कार विजेते वाचनालयाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र आरेकर, इस्रो भेटीसाठी पात्र ठरलेला सोहम बावधनकर, श्रीदेव गोपाळ कृष्ण विद्यामंदिरचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री.सुधाकर कांबळे यांचा ज्ञानरश्मी वाचनालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. Naming Ceremony

Naming Ceremony

यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय गुरव, संचालक ज्योती परचुरे, प्रभुनाथ देवळेकर, ज्ञानेश्वर झगडे, वाचनालयाचे सभासद,  गुहागर शहरातील वाचनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सचिव प्रा.मनाली बावधनकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन श्री बाबासाहेब राशिनकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सोनाली घाडे, शामली घाडे, सानिका जांगळी यांनी मेहनत घेतली. Naming Ceremony

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNaming CeremonyNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet52
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.