गुहागर, ता. 25 : कोकणातील नामांकित सप्तरंगी कोकण कलामंच (मुंबई ) यांचा नमनाचा कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी रात्रौ ८.३० वाजता, साहित्य संघ गिरगाव ( मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कलाकारांना शुभ आशीर्वाद द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. “Naman” program on 30th in Mumbai


कोकणात अनेक लोककला उदयास आल्या. त्यातलीच ‘नमन’ ही लोककला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या दिमाखात सादर केली जाते. कोकणचे खेळे अर्थात लोकनाट्य नमन या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील अनेक मोठं मोठ्या नाट्यगृहात केले जाते, आणि ते पाहण्यासाठी मुंबईतील अनेक कोकणवासीयांची गर्दी सुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने असते. “Naman” program on 30th in Mumbai