आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ
गुहागर, ता. 15 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळाली म्हणून कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेला कलामंच म्हणजे “साई माऊली कलामंच” (मुंबई). यांचा नमनाचा दुसरा प्रयोग रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. मराठी साहित्य संघ मंदिर, चर्नी रोड, (मुंबई ) येथे आयोजित करण्यात आला होता. Naman of “Sai Mauli Kalamanch”

या कार्यक्रमाला सन्मा.श्रद्धा काटवी मॅडम व परिवार, सन्मा.श्री.अनंत मोरे साहेब, पत्रकार नरेश मोरे साहेब, श्री.सागर डावल साहेब, नवतरुण विकास मंडळ धोपटवाडीचे अध्यक्ष श्री विष्णू आंबेकर, श्री.रामदादा धोपट, श्री.लक्ष्मणदादा धोपट, श्री .मोहन आंबेकर, श्री.प्रविण आंबेकर आदी उपस्थित होते. सन्मा.श्रद्धा काटवी व परिवार यांचा कलामंचाचे दिग्दर्शक सन्मा श्री.रमेश ठोंबरे साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर “साई माऊली कलामंच” (मुंबई) या कलामंचाचे लेखक श्री सचिन ठोंबरे व दिग्दर्शक श्री रमेश ठोंबरे यांचा विशेष सत्कार “नवतरुण विकास मंडळ” धोपटवाडी (शीर) चे माजी अध्यक्ष सन्मा.रत्नाकर भागोजी आंबेकर यांनी केला. Naman of “Sai Mauli Kalamanch”

या नमनामध्ये गणेश आराधना, गण-गवळण सहित राधा-कृष्णा यांची “अमर प्रेम कहाणी” रसिक राजाला पहायला मिळाली. राधाकृष्णा यांच प्रबोधन गीत तसेच रासलीला दाखविण्यात आली. शेवटी धार्मिक वगनाट्य साईलीला यामध्ये रसिक राजाला जणु काय साक्षात साईबाबांचे दर्शन घडले. यामध्ये साई कसे प्रकट झाले. साईची लीला काय होती. हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण नमन कार्यक्रमांत रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरी या प्रयोगासाठी सचिन ठोंबरे ९९२०७८२३८१, रमेश ठोंबरे ७३०४२३६१९६, नरेश मोरे ७०३९४९८६९९यांच्याशी संपर्क साधावा. एकंदरीत संपूर्ण “नमन” सोहळा सुंदर संकल्पना सह संपन्न झाला. Naman of “Sai Mauli Kalamanch”

