गुहागर, ता. 20 : खालचापाट भंडारवाडा होळीचे मैदान येथे शिमगोत्सव मंडळातर्फे शुक्रवार दि. 22 मार्च 2024 रोजी रात्रौ 10 वा. श्री देवी वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख यांचे बहूरंगी नमन आयोजित करण्यात आले आहे. Naman at Khalchapat
श्री देवी वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख यांचे बहूरंगी नमन गुहागर येथे प्रथमच सादर होणार आहे. या नमनामध्ये कोकणचे पारंपारीक खेळे, श्री गणेश सुंदर देखावा, स्त्री पात्राने नटलेली नटखट गवळण आणि वगनाट्य सादर करण्यात येणार आहे . तरी सर्वांनी उपस्थित राहून या बहुरंगी नमनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिमगोत्सव मंडळ यांनी केले आहे. Naman at Khalchapat