गुहागर, ता. 16 : तालुक्यात जाण्यासाठी नालासोपारा – बोरिवली – नरवण एस.टी. सुरू करण्यात यावी, यासाठी गुहागर तालुका लोकसेवा संघटनेचे पदाधिकारी एस.टी. महामंडळाच्या कुर्ला येथील विभागीय कार्यालयात उपमहाव्यवस्थापक, मुबई श्रीनिवास जोशी साहेब यांची भेट घेऊन सदर एस. टी. सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. यामुळे नालासोपारा, विरार, वसई तसेच मुंबई पश्चिम उपनगरातील मुंबईकर चाकरमान्यांची सोय झाली आहे. Nalasopara Naravan ST started
त्याअनुषंगाने विभागीय कार्यालयाने नालासोपारा एस. टी. स्थानकाचे स्थानक प्रमुख पारधी साहेब यांना आदेश देऊन सदर मार्गावर एस. टी. सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार नालासोपारा स्थानकातून मंगळवार दि. ७.५.२०२४ रोजी सायंकाळी ६ वा. नालासोपारा – बोरिवली – नरवण आणि बुधवार दि. ८.५.२०२४ रोजी सायंकाळी ६ वा. नरवण येथून सदर एस. टी. नियमित सुरू करण्यात आली आहे. Nalasopara Naravan ST started
सदर एस.टी. चा रविवार दि. १२.५.२०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वा. नालासोपारा एस. टी. स्थानक येथे गुहागर तालुका लोकसेवा संघटनेच्यावतीने स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एसटीला पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून पुजा करण्यात आली. त्यावेळी गुहागर तालूका लोकसेवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. श्री. मिलिंद पाटेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय भास्करराव मोरे याच्यां आठवणीने केली व नालासोपारा एसटीचे स्थानक प्रमुख श्री पारधी साहेब यांना श्री रविंद्र चव्हाण व श्री मिलींद पाटेकर यांनी शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले. Nalasopara Naravan ST started
तसेच सदर एस. टी. चालू करण्यासाठी खूप प्रयत्न करणारे उमराठ गावचे सुपुत्र श्री. सचिनभाऊ पवार, वाहतूक नियत्रंक, ठाणे आगर यांना श्री एकनाथ चव्हाण यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले. सदर एसटी चे चालक यांना श्री .सतिश शिर्के यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले तर गाडीचे वाहक यांना श्री अजय चव्हाण यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले .श्री सचिन पवार व श्री पारधी साहेब यांनी सदर एस.टी. बाबत मनोगत व्यक्त केले व उपस्थित कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले .श्री. मिलिंद पाटेकर व श्री अजय चव्हाण याच्यां संकत्पनेतून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. रविंद्र चव्हाण यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे मनःपुर्वक आभार मानून शुभेच्छा दिल्या. या स्वागत सोहळ्यासाठी उमराठचे सचिन पवार, मढाळचे रविंद्र चव्हाण, सतिश शिर्के, हेदवीचे अजय चव्हाण, मिलिंद पाटेकर, एकनाथ चव्हाण, संतोष सुवारे, उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुनिल आंबेकर तसेच सदर एस. टी. मार्गावरील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Nalasopara Naravan ST started
सदर एस.टी. प्रवासाचा मार्ग
नालासोपारा – विरार मनवेल पाडा – भायंदर हायवे – मीरारोड (काशीमीरा) – दहिसर चेक नाका – दहिसर हायवे गोकुळ हाॅटेल – बोरिवली नॅनो एसटी डेपो – बोरिवली सुकरवाडी एसटी डेपो – नॅशनल पार्क(एक्सीस बॅंक) – देवी पाडा – टाटा पावर – कांदिवली साईबाबा मंदिर – महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी – समता नगर पोलीस स्टेशन – मालाड पुषा पार्क – शांताराम तलाव – गोरेगाव विरवानी – जोगेश्वरी बिंबीसार नगर – इस्माईल काॅलेज – गुंदवली – बहार टाॅकिज – पार्ले हनुमान रोड – आंबा वाडी – पार्ले एअरपोर्ट – सांताक्रूझ आग्री पाडा, मराठा काॅलनी – टिचर्स काॅलनी – बांद्रा कलानगर – धारावी – सायन एसटी डेपो – एव्हराड नगर – मैत्रीपार्क एसटी डेपो – पनवेल एसटी डेपो – महाड – चिपळूण – मालघर – रामपूर – गुढे फटा – चिवेली फाटा – मार्गताम्हाने – मढाळ – पाली फाटा – सुरळ – बोऱ्या फाटा – जामसूद – पिंपर हनुमान मंदिर – वलंजू दुकान – गणेश मंदिर – उमराठ धारवाडी फाटा – उमराठ धारवाडी, डागवाडी – कोंडवीवाडी – मराठवाडी – घाडेवाडी – हेदवी तळे – हेदवी हाॅस्पिटल – उमराठ फाटा – व्हाया उमराठ खुर्द आंबेकरवाडी – हेदवी गणपती मंदिर – नरवण केळपाटवाडी – नरवण असा असावा असे नालासोपारा स्थानक प्रमुख श्री पारधी साहेब यांनी सुचविण्यात आले आहे. सद्या सदर एस.टी. चे आॅनलाईन आरक्षण नालासोपारा – चिपळूण व चिपळूण – नालासोपारा या सांकेतिक शब्दांवर सुरू आहे. Nalasopara Naravan ST started
सदर एस.टी. सेवेचा चा लाभ वसई, नालासोपारा, विरार तसेच मुंबई उपनगरातील मुंबईकर चाकरमान्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन गुहागर तालुका. लोकसेवा संघटनेचे पदाधिकारी अजय चव्हाण, मिलिंद पाटेकर आणि रविंद चव्हाण यांनी केले आहे. Nalasopara Naravan ST started