वाहनाचा टायर फुटून उलटल्याने झाला अपघात
गुहागर, ता. 16 : गुहागर-विजापूर रोडवरती शृंगारतळी बर्मा रे नर्सरी जवळ ७०९ गाडीचा मागील टायर फुटल्याने भीषण अपघातात झाला. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. हे सर्व खेर्डी चिपळूण वरून गुहागरकडे स्लॅब टाकण्यासाठी निघाले होते. या गाडीमध्ये ड्रायव्हर धरून ११ जण होते. तीन महिला होत्या. Crushing death of women
हा अपघात एवढा भीषण होता की, गुहागरच्या दिशेने निघालेली गाडी उलट दिशेला रोड वरती पलटी झाली. पुरुष मंडळींनी गाडी पलटी झाल्याबरोबर लगेच उड्या मारल्या मात्र महिला या गाडीमध्ये अडकून पडल्या त्यांच्या छाती वरती मिक्सर मशीन पडल्यामुळे त्या गाडीतच जागेवरती मृत्यूमुखी पडल्या. हा अपघात सकाळी ८.३० दरम्यान घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघात ग्रस्त गाडी क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने रोडच्या बाजूला उभे करण्यात आली आहे तर अपघातामध्ये मयत दोन्ही महिलांना चिखली आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिकेने नेण्यात आले. घटनास्थळी गुहागर पोलीस दाखल होऊन पुढील कारवाई करत आहेत. मयत पार्वती विठ्ठल मानसुंगि पाटिल, वय-४७, कविता गंगाराम राठोड -वय-३०, सर्व राहणार विजापूर सद्या रा. चिपळूण खेर्डी येथील आहेत. Crushing death of women