भाऊ प्रशांत कदम यांचे जिल्हा अधिक्षकांना निवेदन
गुहागर, ता. 05 : खेड तालुक्यातील आंबडस येथील गणेश माने यांच्या खुनामध्ये आपला भाऊ प्रदिप सिताराम कदम यांना नाहकच खोटया गुन्हयामध्ये भरडले गेले आहे. तो त्या दिवशी चिंचघरी व मुंढे येथे गेला होता. अशाप्रकारचे निवेदन जिल्हा अधिक्षक यांच्याकडे दिले असून याविषयी सत्यता पडताळून तपासकामात सामील करावे व पारदर्शक तपास करावा, अशी विनंती त्याचा भाऊ प्रशांत कदम यांनी केली आहे. Murder of Ganesh Mane
खेड तालुक्यातील आंबडस येथील गणेश माने यांच्या खुनाच्या पार्श्वभूमिवर गुहागर पोलिस ठाण्यात २ जून रोजी दाखल झालेल्या गुन्हयामध्ये चिपळुण तालुक्यातील भेलसई, चौथाई वरची वाडी येथील प्रदिप कदम यांना दोन नंबर आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. याबाबत त्यांचा भाऊ प्रशांत कदम यांनी जिल्हा अधिक्षक, अतिरिक्त जिल्हा अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण तसेच पोलिस निरिक्षक गुहागर यांना निवेदन सादर केले आहे. याबाबतचे वृत्तपत्रांनाही प्रसिद्धी पत्रक दिले आहे. Murder of Ganesh Mane
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/06/add-1-240x300.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/06/add-1-240x300.jpg)
यामध्ये गुहागर पोलिसांनी गणेश माने यांचा खून हा १७ एप्रिल २०२४ रोजी झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. परंतु, १७ एप्रिल रोजी माझा भाऊ प्रदिप कदम हा संपुर्ण दिवस त्याचे खाजगी गाडीचे भाडे घेवुन मौजे चिंचघरी व त्यानंतर मौजी मुंढे येथे गेला होता. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे केलेल्या पत्र व्यवहारामध्ये १७ एप्रिल २०२४ रोजी माझा भाऊ प्रदिप कदम याचेसोबत दिवसभर असलेल्या लोकांची नावे दिली आहेत. त्याप्रमाणे संबधीत लोकांकडे चौकशी करून तसेच सदर गोष्टीची शहानिशा करून व सत्यता पडताळून तपासकामात सामील करावे व पारदर्शक तपास करावा. अशी विनंती केली असल्याचे त्याचा भाऊ प्रशांत कदम यांनी म्हटले आहे. Murder of Ganesh Mane