• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

MPSC कडून 320 जागांसाठी भरती जाहीर

by Guhagar News
January 21, 2025
in Bharat
161 2
0
MPSC recruitment for the posts announced
317
SHARES
905
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू;  शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025

गुहागर, ता. 21 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. एमपीएससीने या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून (21 जानेवारी) सुरु होणार आहे.  MPSC recruitment for the posts announced  

एमपीएसस्सीच्या या भरती अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ या संवर्गासाठी 2025 जागांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यात 9 जागा या दिव्यांगासाठी आरक्षित असून त्यासाठी स्वतंत्र जाहिरात काढण्यात आली आहे. तसेच विविध विषयातील विशेषज्ञ संवर्ग या रिक्त पदासाठी 95 जागांवर भरती केली जाणार आहे आणि यासाठी देखील स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC recruitment for the posts announced

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा

आरोग्य विभागात ही भरती केली जाणार असल्याने त्यासाठी पात्रता देखील आरोग्यविषयाती आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 38 वर्षे आहे. हे वय 1 मे 2025 या तारखेनुसार मोजले जाईल. हे लक्षात घ्या की राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी https://mpsc.gov.in/adv_notification/8 या लिंकवर क्लिक करा. MPSC recruitment for the posts announced

या भरतीअंतर्गत राखीव प्रवर्ग, खेळाडू, महिला आणि दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीची अर्जप्रक्रिया 21 जानेवारी 2025 पासून म्हणजेच आज मंगळवारपासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाइन पद्धतीनेच अर्जशुल्कदेखील भरायचे आहे. MPSC recruitment for the posts announced

अर्ज करताना https://mpsconline.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे दिलेल्या सूचना वाचून तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा लागेल. या भरती अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये अर्ज शुल्क आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ, दिव्यांगांना 449 रुपये इतकी अर्ज शुल्क भरावे लागेल. हे अर्ज शुल्क ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन मोडमध्ये भरले जाऊ शकते. MPSC recruitment for the posts announced

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMPSC recruitment for the posts announcedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share127SendTweet79
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.