गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेचा निर्णय; उद्यापासून आरक्षण सुरू
मुंबई, ता. 06 : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२ फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. More trains will leave on the Konkan railway route
या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश आहे. ही ०१०३१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६, ७, १३, १४ सप्टेंबर या दिवशी ८ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ४:५० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ०१०३२ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७, ८, १४, १५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी ५:१५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. More trains will leave on the Konkan railway route
पनवेल – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ही ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात आला आहे. More trains will leave on the Konkan railway route


पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबरला ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. More trains will leave on the Konkan railway route
पनवेल – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ही ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात आला आहे. More trains will leave on the Konkan railway route
पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबरला ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. यामध्ये पनवेल – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्यांचा समावेश आहे. ०१४४१ विशेष गाडी ११ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता पनवेल येथून सुटून रत्नागिरी येथे ११:५० वाजता पोहोचेल. तर ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४५ विशेष गाडी १० रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. More trains will leave on the Konkan railway route