गुहागर, ता. 24 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांना प्रयोगशाळा सहाय्यक रणजित किल्लेकर यांची गुहागर येथे पुन्हा बदली करावी तसेच तालुक्यातील शाळांची दुरुस्तीसाठी तात्काळ निधी देण्यात यावे या मांगण्यांचे निवेदन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिले. MNS’s statement to Guardian Minister
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, प्रसाद विखारे, विवेक जानवळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी गुहागर पाटपन्हाळे येथील श्री पूजा हॉल येथे आले होते. त्यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. MNS’s statement to Guardian Minister
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर ग्रामीण रुग्णालयातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्रशासकीय बदली झालेले प्रयोगशाळा सहाय्यक रणजित किल्लेकर यांची गुहागर ग्रामीण रुग्णालयात पुन्हा बदली करण्यात यावी. गुहागर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट सेवा देणारे प्रयोगशाळा सहाय्यक रणजित किल्लेकर हे सध्या उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे सेवा देत आहेत. गुहागर येथे पुन्हा बदली करण्यात यावी अशी मागणी यापूर्वीही मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र याबाबत कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही. गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून पदावर असलेले रणजित किल्लेकर हे गेली १० वर्ष अविरतपणे काम करत होते. MNS’s statement to Guardian Minister
गुहागर हे तालुक्याचे ठिकाण असून मोठ्या प्रमाणात येथे रुग्णांची वर्दळ असते. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्रयोगशाळा सहाय्यक रणजित किल्लेकर हे सर्व रुग्णांशी उत्तम सुसंवाद साधून सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या आणि रुग्णांना आरोग्य सेवेचे मार्गदर्शन आणि आदराची वागणूक देवून वेळोवेळी दिवस रात्र अशी कोणतीही वेळ न पाहता रुग्णांना सेवा देत होते. कोरोना काळात उत्तम आरोग्य सेवा दिली होती. गुहागर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने त्यांची पुन्हा नियुक्ती ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे करण्यात यावी. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून या संदर्भात अनेक वेळा पंचायत समिती व जिल्हा परिषद रत्नागिरी येथील शिक्षण विभागाला मनसेतर्फे निवेदन देण्यात आले. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरीब व गरजू विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिकावे लागत आहे. काही शाळांची लोकसभेच्या निवडणूक पूर्वी थोडीफार दुरुस्ती करण्यात आली. अनेक शाळा आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. आपण जिल्ह्याचे पालक असून तातडीने या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. MNS’s statement to Guardian Minister