• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस व होमगार्ड यांचा मनसे तर्फे सत्कार

by Ganesh Dhanawade
September 14, 2024
in Guhagar
240 2
0
MNS felicitates Police and Home Guard
471
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी व मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर पोलिस व होमगार्ड यांच्याकडून वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने यावर्षी वाहतूक कोंडीचा सामना गणेश भक्तांना करावा लागला नाही. गणेश उत्सवा दरम्यान दिवस-रात्र तसेच ऊन- पावसात सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे यांचा सत्कार करण्यात आला. MNS felicitates Police and Home Guard

यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, शृंगारतली बाजारपेठ मध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी गुहागर पोलिसांनी विशेष मेहनत घेतले आहे, दिवस रात्र त्याचप्रमाणे ऊन पावसाळा सामना करत वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, आज प्रत्येक नागरिक  गणपती उत्सवाचा आनंद घेत असताना पोलीस मात्र  २४ तास जनतेची सेवा करत आहेत, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचे योग्य मार्गदर्शनानुसार सर्व पोलीस व होमगार्ड चांगले काम करत असल्याचे सांगितले. MNS felicitates Police and Home Guard

यावेळी मनसे शेतकरी तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, विभाग प्रमुख नितीन कारकर, महाराष्ट्र सैनिक विवेक शिर्के, दिलीप आगरे, निकिता कारकर, विराज साळवी आदी उपस्थित होते. गणेश उत्सवा दरम्यान हजारो ग्राहकांनी शृंगारतळी बाजारपेठ मध्ये गर्दी केली होती, बाजारपेठेच्या मध्यभागी  एस टी.थांबा असल्याने अनेक एस.टी. येथे थांबत असतात. एस.टी थांबत असल्या या ठिकाणी  नो पार्किंगचा फलक लावण्यात आला होता. नो पार्किंग असल्याने प्रवाशांना एसटीमध्ये चढताना व उतरताना अडचण निर्माण झाली नाही. नो पार्किंग जागेमध्ये इतर कुठलेही वाहन उभे राहणार नाही याची काळजी पोलीस व होमगार्ड यांच्याकडून घेतली जात होती. MNS felicitates Police and Home Guard

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMNS felicitates Police and Home GuardNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share188SendTweet118
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.