गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी व मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर पोलिस व होमगार्ड यांच्याकडून वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने यावर्षी वाहतूक कोंडीचा सामना गणेश भक्तांना करावा लागला नाही. गणेश उत्सवा दरम्यान दिवस-रात्र तसेच ऊन- पावसात सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे यांचा सत्कार करण्यात आला. MNS felicitates Police and Home Guard
यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, शृंगारतली बाजारपेठ मध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी गुहागर पोलिसांनी विशेष मेहनत घेतले आहे, दिवस रात्र त्याचप्रमाणे ऊन पावसाळा सामना करत वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, आज प्रत्येक नागरिक गणपती उत्सवाचा आनंद घेत असताना पोलीस मात्र २४ तास जनतेची सेवा करत आहेत, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचे योग्य मार्गदर्शनानुसार सर्व पोलीस व होमगार्ड चांगले काम करत असल्याचे सांगितले. MNS felicitates Police and Home Guard
यावेळी मनसे शेतकरी तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, विभाग प्रमुख नितीन कारकर, महाराष्ट्र सैनिक विवेक शिर्के, दिलीप आगरे, निकिता कारकर, विराज साळवी आदी उपस्थित होते. गणेश उत्सवा दरम्यान हजारो ग्राहकांनी शृंगारतळी बाजारपेठ मध्ये गर्दी केली होती, बाजारपेठेच्या मध्यभागी एस टी.थांबा असल्याने अनेक एस.टी. येथे थांबत असतात. एस.टी थांबत असल्या या ठिकाणी नो पार्किंगचा फलक लावण्यात आला होता. नो पार्किंग असल्याने प्रवाशांना एसटीमध्ये चढताना व उतरताना अडचण निर्माण झाली नाही. नो पार्किंग जागेमध्ये इतर कुठलेही वाहन उभे राहणार नाही याची काळजी पोलीस व होमगार्ड यांच्याकडून घेतली जात होती. MNS felicitates Police and Home Guard