“एक समाज एक संघ “, “समाज एकता मनसे चषक २०२५ क्रिडा स्पर्धा
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांचे वतीने “एक समाज एक संघ”, ” समाज एकता मनसे चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांचे आयोजक माझे तरुण सहकारी श्री. प्रमोद गांधी यांचे मी कौतुक करायला आलो आहे चांगल्या उपक्रमांचे कौतुक करणे तुंम्हाला प्रोत्साहन देणे आणि चांगलं काम करता ते अधिक तुमच्या हातून चांगल व्हावं याकरिता म्हणून मी तुंम्हा सर्वांना वाटेल त्या वेळेला मदत करणं हे आपलं काम आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. माझा सत्कार करताना प्रमोद गांधी यांनी माझ्यावर छत्री धरली आणि मी छत्रीखाली गेलो कोण कुणाच्या छताखाली गेलं याला महत्त्व नाही त्यांनी छत्री धरल्याने मीच त्यांच्या छत्रीखाली गेलो त्यामुळे आता किती उन, पाऊस आणि कीती वादळे आली. तरी प्रमोद गांधी आता मला कसलीच चिंता नाही अशा विनोदी शैलीत गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांनी मनसेच्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना चौकार आणि षटकारांची फटकेबाजी केली. MNS Cup 2025 Sports Tournament


आमदार जाधव पुढे म्हणाले की, मला विशेष करून प्रमोद गांधीना धन्यवाद दिले पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे जो उपक्रम आदर्श आहे, एक नाविन्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये कल्पकता आहे. त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या पण त्या स्पर्धांना त्यांनी नाव दिलं “एक समाज एक संघ” अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांनी एक नविन कल्पकता सर्वांसमोर याठिकाणी आणली आणि म्हणून मी प्रमोद गांधी यांच कौतूक मनापासून करतो आणि त्यांच्या सर्व सहका-यांना धन्यवाद देतो. या स्पर्धेत त्यांनी १२ समाजाच्या १२ संघाना संधी दिली पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघातील कोणा एका विशिष्ट समाजाचीच स्पर्धा न भरवीता त्यांनी या मैदानात संपूर्ण समाजाला संधी निर्माण करुन दिली. हा त्यांचा कौतुकास्पद उपक्रम आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम असतो त्याच वेळेला या मतदार संघाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून अशा सामाजिक उपक्रमांचे कौतूक करायला आलो आहे. असे स्पष्ट मत गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले. MNS Cup 2025 Sports Tournament


यावेळी मनसेचे गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि मनसेची छत्री भेट देऊन गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांचा सत्कार करण्यात आला तर मनसेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे हस्ते जाधव यांचे स्वयंसहाय्यक संतोष तांदळे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि मनसेची छत्री भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेश (दादा) सावंत, माजी सभापती सुनिल पवार, मराठा समाजाचे गुहागर तालुका अध्यक्ष भगवानराव कदम, सरपंच विजय तेलगडे, साबीर साल्हे, उपसरपंच आसिम साल्हे, पिंट्या संसारे, मामा शिर्के, सचिन जाधव, ममताजभाई ठाकूर, आदी. मान्यवर उपस्थित होते. MNS Cup 2025 Sports Tournament