• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर

by Guhagar News
August 5, 2024
in Politics
148 1
0
MNS candidate for Legislative Assembly announced
291
SHARES
830
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूरमधून उमेदवारी

मुंबई, ता. 05 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे. MNS candidate for Legislative Assembly announced

मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी  पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे  अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा – नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवारी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. MNS candidate for Legislative Assembly announced

शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडे यांचा पराभव करुन, दुसऱ्यांदा विधानसभेवर ठाकरेंचा झेंडा फडकवला होता. MNS candidate for Legislative Assembly announced

शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1995-2004) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केलेला. सोलापूर जिल्ह्यात मनसेची पाळंमुळं रोवण्यात धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शॅडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांना पक्षात नेतेपद देण्यात आलं आहे. MNS candidate for Legislative Assembly announced

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMNS candidate for Legislative Assembly announcedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.