• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आमदार निरंजन डावखरे रत्नागिरीत

by Guhagar News
June 21, 2024
in Ratnagiri
69 1
1
MLA Niranjan Davkhare in Ratnagiri

MLA Niranjan Davkhare in Ratnagiri

137
SHARES
390
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मतदारांच्या भेटीगाठी घेणार

रत्नागिरी, ता. 21 : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार तथा उमेदवार निरंजन डावखरे आज दि. २१ जून रोजी रत्नागिरीत येणार आहेत. रत्नागिरी शहरातील मतदारांशी संवाद साधणार आहेत. शहरातील विविध शाळा, शैक्षणिक संस्था, वकिल मतदारांना ते भेटून आपली भूमिका मांडणार आहेत. या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी डावखरे यांनी ताकद पणाला लावली आहे. MLA Niranjan Davkhare in Ratnagiri

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार आहे. सहा जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. श्री. डावखरे यांनी या मतदारसंघात सलग दोन वेळा विजय मिळवला असून आता तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवत असून मतदारांशी संपर्क साधत आहेत. भाजपा महायुतीनचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचारयंत्रणा राबवली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचारार्थ मेळावा घेतला. तसेच भाजपाचे कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यूहरचना केली आहे. MLA Niranjan Davkhare in Ratnagiri

रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये निरंजन डावखरे यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा नेते अॅड. दीपक पटवर्धन, निवडणूक प्रमुख मनोज पाटणकर यांच्यासमवेत शहराध्यक्ष राजन फाळके, माजी नगरसेवक, तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष व विविध आघाड्यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. भेटीगाठी घेतल्यानंतर श्री. डावखरे दुपारी देवरुख, साखरपा येथील मतदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच रात्री पुन्हा रत्नागिरीत येणार असून त्यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी वार्तालाप, काही ठिकाणी मतदारांशी संपर्क साधण्यात येणार आहेत. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी जाणार आहेत. MLA Niranjan Davkhare in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMLA Niranjan Davkhare in RatnagiriNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.