आगामी निवडणुकांसाठी धोक्याची घंटा
गुहागर, ता. 07 : गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांनी महायुतीचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. भास्कर जाधव यांनी निसटत्या २,८३० मतांनी विजय मिळवला असला तरी गुहागर तालुक्यात त्यांच्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून पडलेली कमी मते आगामी निवडणुकासाठी त्यांना विचार करायला लावणारी आहे. MLA Jadhav’s victory
भास्कर जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील ९२ मतदान केंद्रांवर २ हजार ५७६ व खेड तालुक्यातील ९० मतदान केंद्रांवर ५,७७० मतांची आघाडी घेतली, तर राजेश बेंडल यांना गुहागर तालुक्यातील १४० मतदान केंद्रांवर ५ हजार ७५४ मतांची आघाडी घेण्यात यश आले. MLA Jadhav’s victory
गुहागर विधानसभा निवडणूक आ. जाधवांसाठी सुरवातीला एकतर्फी वाटत होती. महायुतीच्या वतीने राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रंगत वाढली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मित्र पक्ष आणि कुणबी समाज यांनी बेंडल यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक चूरशीची वाटू लागली. भास्कर जाधव कि राजेश बेंडल विजयी होणार अशी चर्चा सुरु झाली. भास्कर जाधव यांना पहिल्याच चार फेरीत मिळालेले ८ हजाराचे मताधिक्य निर्णायक ठरले. या फेऱ्या खेड तालुक्यातील होत्या. खेड तालुक्यातून जाधव यांना ५,७७० मतांची आघाडी मिळाली. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शिरशी मोहल्ला, मोमके, मुंबके, अलसुरे, आष्टी येथे ४००हून अधिक, भोस्तेमधील दोन केंद्रांवर ४६४, कोंडिवली शिव बुद्रुक खोतवाडी असगणी या मतदान केंद्रांवर तीनशेहून अधिक मताधिक्य घेतले. भास्कर जाधव यांना पडवेतील दोन केंद्रांवर ५०४, गुहागर वरचापाट ४१५, शृंगारतळी ४७६, पालशेत ३०१, तसेच वरवेली, सुरळ, रामानेवाडी, कौंढर काळसूर येथून २०० मताधिक्य मिळाले. MLA Jadhav’s victory
खेड तालुक्यात राजेश बेंडल पूर्णपणे पीछाडीवर गेले. त्यांना केवळ खारीमधून १६२ व बहिरवली २०८ या दोन केंद्रांवर एवढेच मोठे मताधिक्य घेता आले. चिपळूण तालुक्यात २,५७६ मतांनी भास्कर जाधव आघाडीवर होते. यामध्ये कामथे व कामथे खुर्द दोन केंद्रांवर ६८८, भोममधील दोन केंद्रांवर ४४६, लोणारी बंदर ३००, कापरे, कातरोळी, कोकरे या केंद्रांवर त्यांनी २०० हून अधिक आघाडी घेतली. राजेश बेंडल यांना वहाळमधील दोन केंद्रांवर ४६०, मुर्तवडे व कातळवाडी या केंद्रांवर ३५५ मताधिक्य मिळाले. पोसरे, आंबीडगाव, खेरशेत या केंद्रांवर २०० हून अधिक २०० हून मताधिक्य मिळाले. गुहागर तालुक्यातून राजेश बेंडल यांनी ५,७७० मतांची आघाडी घेतली. गुहागर खालचापाट केंद्रावर ५०८, हेदवी ३६६, अंजनवेल कातळवाडी ३२८, तसेच भातगाव तिसंग व धक्का या दोन केंद्रांवर ३९२ मताधिक्य घेतले. कौंढर, काळसूर, पालशेत, शीर, मासू, नरवण या केंद्रांवर २०० हून अधिक मताधिक्य २०० हून मिळाले. MLA Jadhav’s victory