• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करराव जाधव यांच्या पत्राचा दणका

by Manoj Bavdhankar
January 6, 2025
in Guhagar
403 4
0
MLA Jadhav's letter to the contractor company
792
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर विजापूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती कराच;  ठेकेदार कंपनीला पत्र

गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून तीन किलोमीटरच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी दिलेल्या पत्राची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी संबंधित ठेकेदाराला या मार्गावरील खड्डे ताबडतोब डांबराने बुजवावेत अशा स्वरूपाच्या सूचनांचे पत्र धाडले आहे. MLA Jadhav’s letter to the contractor company

गुहागर चिपळूण कराड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई वरील किलोमीटर 0/00  ते 03/00 या महामार्गाच्या लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे आणि वाहनधारक देखील त्रस्त झाले आहेत.  गुहागर शहरापासून शृंगारतळीकडे जाणार 3 किलोमीटरचा हा रस्ता खड्ड्यांमुळे अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, इतकी वाईट अवस्था झाली असल्याने त्याची तात्काळ डागडुजी करावी, असे पत्र आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. MLA Jadhav’s letter to the contractor company

यावर या विभागाचे उपअभियंता श्री. नाजीम मुल्ला यांनी या कामाचे ठेकेदार असलेल्या मे. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि राज कन्स्ट्रक्शन या कंपनीला पत्र पाठवून येत्या 2-3 दिवसांत खराब रस्त्याची डागडुजी डांबराने करून मंजूर निविदा अटी शर्तीनुसार व करारनामाप्रमाणे रस्ता सुस्थितीत ठेवावा, अशा सूचना दिल्या आहेत. हे काम तात्काळ सुरू न केल्यास खड्डे भरण्याचे हे काम कंपनीच्या जोखीम व खर्चातून करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी ठेकेदार कंपनीला दिला आहे. MLA Jadhav’s letter to the contractor company

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMLA Jadhav's letter to the contractor companyNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share317SendTweet198
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.