गुहागर, ता. 17 : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार भास्कर जाधव आपला उमेदवारी अर्ज २२ ऑक्टोबर रोजी भरणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. MLA Jadhav will fill the Nomination form


महाविकास आघाडीचे उमेदवार कोण? हा प्रश्न सर्व तालुक्याला पडला होता. विक्रांत जाधव की भास्कर जाधव? अखेर भास्कर जाधव आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे शिक्का मोर्तब झाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. त्यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. MLA Jadhav will fill the Nomination form