गुहागर, ता. 04 : शिवसेना नेते, उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेचे गटनेते, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्करराव जाधव उद्या गुहागर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या शुभहस्ते निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत साखरीआगर येथे नविन बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आम. भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. MLA Bhaskarrao Jadhav visit Guhagar


या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांतदादा जाधव, माजी जि.प सदस्या नेत्राताई ठाकुर, शेखर भिल्लारे (गटविकास अधिकारी गुहागर), अशोक विष्णू मोहिते, सौ. अश्विता अशोक मोहिते (जागा मालक), परिक्षित पाटील (तहसीलदार गुहागर), प्रमोद केळस्कर (गटविकास अधिकारी गट अ, पं. स गुहागर), श्री. छत्रे (ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागर), संजय सलमाके (उप अभियंता बांधकाम विभाग गुहागर), महेश नाटेकर (गुहागर तालुका मच्छिमार समिती विद्यमान -अध्यक्ष), सचिन सांवत (पोलीस निरीक्षक गुहागर) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे. तरी ग्रामस्थ व महिलांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे निमंत्रण सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी व कर्मचारी वृंद निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत साखरीआगर यांच्यावतीने करण्यात आले आहे. MLA Bhaskarrao Jadhav visit Guhagar