• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीच्या समुद्रात मध्यरात्रीच्या सुमारास थरार

by Mayuresh Patnakar
January 10, 2025
in Ratnagiri
5.8k 58
14
Midnight thrill in the sea of Ratnagiri
11.4k
SHARES
32.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परप्रांतीय हायस्पीड बोटींनी अधिकाऱ्यांच्या गस्तीनौकेला  घेरले

रत्नागिरी, ता. 10 : समुद्रात परप्रांतीय बोटीच्या हालचालीवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर वॉच राहावा यासाठी ड्रोन प्रणालीचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. अशातच बुधवारी रात्री उशिरा रत्नागिरी समुद्रात धक्कादायक थरारक घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  Midnight thrill in the sea of ​​Ratnagiri

Midnight thrill in the sea of Ratnagiri

गस्तीनौकेतील अधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास 35 ते 40 हायस्पीड बोटीने अधिकाऱ्यांच्या गस्तीनौकेला घेरले. अवैध मासेमारी करणाऱ्या या बोटींना पकडण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर बोटिंवरील खलाशांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली. यावेळी मोठा बाका प्रसंग पाहून प्रसंगावधान राखून अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला व सूत्र हलली. उद्योगमंत्री उदय सामंत व जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनाही यावेळी संपर्क करण्यात आला. या सगळ्या गंभीर घटनेची तात्काळ दाखल घेत त्यांनी स्थानिक मच्छीमार व पोलीस कुमक पाठवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या सगळा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उशिरा रत्नागिरी जवळ समुद्रात घडला आहे. यावेळी गस्तीनौकेवर मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी चिन्मय जोशी व पार्थ तावडे हे परवाना अधिकारी व सहा सागरी सुरक्षारक्षक असे एकूण आठ जण होते. Midnight thrill in the sea of ​​Ratnagiri

Midnight thrill in the sea of Ratnagiri

समुद्रात अवैध बोटी असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची गस्तीनौका गोळप-पावस या दिशेने गेली होती. यावेळी हा प्रकार घडला. रात्री हायस्पीड ट्रॉलरनौका समुद्रात अवैध मासेमारी करत होत्या. त्यांचा पाठलाग करत असता कर्नाटक मालपे येथील नौका “अधिरा” IND-KL-02-MM5724 या नौकेचा ताबा घेताना 35 ते 40 नौकांनी अधिकाऱ्यांची गस्ती नौका घेरली. तसेच पकडलेल्या नौक्यावरील खलाशांनी गस्तीनौकेवरील  कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला इतकेच नाही तर यावेळी फास्टर बोटीवरील खलाशांनी गस्तीनौकेच्या दिशेने दोऱ्या सोडून गस्तीबोट अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोऱ्यांच्या जाळ्यात त्यांचीच फास्टर बोट अडकली व बंद पडली. दरम्यान प्रसंगावधान राखून बंद पडलेली फास्टर बोट कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली. आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या बोटीना व मच्छीमारांना वायरलेस वरून तात्काळ मदतीचा संदेश देण्यात आला. रात्री उशिरा हा सगळा समुद्रातील थरारक प्रसंग भर समुद्रात जीवावर बेतणारा होता. मात्र स्थानिक नौकांची मदत, मंत्री सामंत यांनी केलेली मदत, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी घेतलेली गंभीर दखल घेऊन पाठवलेली कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे हा मोठा अनर्थ टळला. त्यांनीच टाकलेल्या दोऱ्यांच्या जाळ्यात अडकून बंद पडलेली फास्टर बोट मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली. तर गस्तीनौकेचं एक इंजिन बंद पडल्याने ती एका इंजिनवर किनाऱ्यावर आली. संबंधित परप्रांतीय नौकेवर म.सा. मा. नि. अ. 1981 अंतर्गत गुन्हा दाखल करणे ची कार्यवाही सुरू आहे. Midnight thrill in the sea of ​​Ratnagiri

कर्नाटक मलपे येथील “अधिरा” IND-KL-02-MM5724 या फास्टर बोटीला व सात कलाशांना ताब्यात घेण्यात आल आहे. बाकी परप्रांतीय बोटीनी पलायन केल. पकडण्यात आलेल्या बोटीवरील माशांचा लिलाव रत्नागिरी येथे गुरुवारी करण्यात आला. या लिलावातून मिळणाऱ्या रकमेच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. तसेच फास्टर बोटीवरील एकूण सात परप्रांतीय खलाशी यांच्याविरोधात रत्नागिरी पोलीस ठाण्यात मत्स्य परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी  फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. Midnight thrill in the sea of ​​Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMidnight thrill in the sea of RatnagiriNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share4546SendTweet2841
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.