संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.१ या शाळेचा विद्यार्थी गुणगौरव व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे सरपंच श्री. संतोष आंब्रे यांनी भूषवले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.अनिलजी जोशी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आजी- माजी विद्यार्थी, पालक, सर्व ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी कठोर परिश्रम घेतले. Merit Program at Pacheri Sada School
या कार्यक्रमासाठी इंद्रायणी मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टीम चे मालक श्री.आंब्रे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय वाघ यांनी आपल्या प्रास्तविक मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले त्याबद्दल मौलिक माहिती दिली. विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य व कला क्षेत्रातील प्राविण्य पाहून सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोकणातील विविध कला, देशभक्तीपर गीत, नाटिका, व नृत्य आविष्कार सादर करून पाचेरीसडा पंचक्रोशितील ग्रामस्थांना आकर्षित केले व सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर भरभरून बक्षिसांचा वर्षाव केला. Merit Program at Pacheri Sada School
विशेष म्हणजे मुंबईकर मंडळ यांनीही हा कार्यक्रम मुंबई वरून ऑनलाईन पद्धतीने पाहून विद्यार्थ्यावर बक्षिसांचा ऑनलाईन फोन पे द्वारे वर्षाव केला त्यांचेही आभार मानले गेले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री.विश्वास खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय वाघ, श्रीम. किर्ती रुईकर, श्री. सचिन लबडे व श्रीम. शिल्पा गोयथळे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Merit Program at Pacheri Sada School