सावर्डे ते भोके रेल्वेस्थानका दरम्यान अडीच तासांचा ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी, ता. 23 : कोकण रेल्वे मार्गावर उद्या शुक्रवार, दि. २४ मे रोजी सावर्डे ते भोकेदरम्यान अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ‘Megablock’ on Konkan railway line
कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोकेदरम्यान दि. २४ मे रोजी सकाळी ७ ते ९.३० असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळ एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१७) ही २३ रोजी धावणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ५० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.तसेच २३ मे रोजी तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी गाडी (क्रमांक २०९२३) कोकण रेल्वे मार्गावर दि. २४ रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास १० मिनिटे थांबवली जाणार आहे. ‘Megablock’ on Konkan railway line