• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर ते विश्रामगृह रस्त्याबाबत महत्वाची बैठक

by Guhagar News
April 19, 2025
in Guhagar
183 2
0
Meeting regarding Guhagar to Rest House road
360
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उद्या २० एप्रिल रोजी रस्ता दुरुस्तीबाबत आंदोलन रूपरेषा ठरणार

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : गुहागर ते शासकीय विश्रामगृह पर्यंत चा प्रमुख मार्ग अत्यंत खराब आणि धोकादायक बनला आहे. वाहतूकीसाठी योग्य नाही वारंवार सांगून आणि निदर्शनास आणून देखील संबंधित अधिकारी व ठेकेदार या महत्वाच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत याबद्दल निषेध व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या रविवारी दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी गुहागर  येथील वाहन चालक व मालक तसेच  येथील जागृत नागरिक यांची  महत्वाची बैठक  बोलावण्यात आली आहे. तरी या मीटिंगला समस्त नागरिकांनी सकाळी ११:०० वाजता गुहागर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवास येथे उपस्थितीत रहावे, असे आवाहन पत्रकार पराग कांबळे व सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ रहाटे यांनी केले आहे. Meeting regarding Guhagar to Rest House road

यापूर्वी प्रवासी  संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. या आंदोलनाचे पूर्व तयारीची बैठक उद्या  रविवारी होतं आहे. या बाबत   सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनात या गंभीर विषयावर मोठी चर्चा करून जाब विचारण्यात येणार आहे. योग्य निर्णय न झाल्यास एक मे रोजी उपोषण तयारी व त्या  नंतर पंधरा दिवसांनी मुख्य रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तर गुहागर स्टाईल ने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पराग कांबळे, विशवनाथ रहाटे, विकास जाधव, शाम साटले, बाबुशेट गुहागरकर,  वसंत बेटकर, प्रभूनाथ देवळेकर, विद्याधर गोयथळे, ॲड.दिनेश कदम, विकास भागडे, प्रवीण साटले, यांनी दिला आहे. Meeting regarding Guhagar to Rest House road

गुहागर हे  जागतिक पर्यटन केंद्र आहे. असे असले तरी प्रवेश द्वाराचा मुख्य रस्ता खराब आहे. प्रशासन अधिकारी सुद्धा या बाबत काहीच करीत नाहीत तर लोकप्रतिनिधी यांना काहीच पडलेले नाही असा घणाघाती आरोप पराग कांबळे यांनी केला आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होतं आहेत. सर्वसामान्य जनतेचे वाहन चालक व मालक व नागरिक यांचे बेहाल होतं आहेत. या बाबत चर्चा व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जागृत नागरिकांनी बैठकीला वेळेवर उपस्थितीत रहावे, असे आवाहन पराग कांबळे यांनी केले आहे. Meeting regarding Guhagar to Rest House road

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMeeting regarding Guhagar to Rest House roadNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share144SendTweet90
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.