अध्यक्ष दत्तात्रय गुरव तर कार्याध्यक्ष विश्वास बेलवलकर
गुहागर, ता. 09 : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती तालुका शाखा गुहागर या पेंशनर संघटनेची सभा पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय पर्शुराम गुरव तर कार्याध्यक्ष पदी विश्वास जयराम बेलवलकर यांची फेरनिवड करण्यात आली. Meeting of Pensioners Association
यावेळी संघटनेचे रत्नागिरी जिल्हा शाखा अध्यक्ष श्री बबन सदाशिव बांडागळे, राज्य कोषाध्यक्ष श्री विश्वनाथ गणपत बेलवलकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री कृष्णा बाबू उकार्डे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व विभागीय अध्यक्ष श्री दिवाकर धोंडू कानडे यांचे उपस्थितीत व मार्गदशनाखाली नवीन तालुका कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. तालुका कार्यकारिणी उपाध्यक्ष पदावर श्री गंगाधर राया जाधव यांची तर सरचिटणीस पदी श्री शांताराम लक्ष्मण बैंडल यांची फेरनिवड करण्यात आली. श्री विनायक विष्णू काणेकर कोषाध्यक्ष, श्री सिध्दार्थ शिवराम जाधव व श्री रमेश केशव जाक्कर सहसरचिटणीस, श्री संतोष गंगाराम धामणस्कर संघटक, श्री रामचंद्र रत्नू हुमणे व सुलतान रसुल मुलाणी यांची सल्लागार पदावर निवड करण्यात आली. तसेच संघटनेचे सदस्य पदावर शबनम युसूफ मुल्ला, विजया सुभाष कोळवणकर, शर्मिला विलास चव्हाण, अस्मिता अनंत पराडकर, सुप्रिया जयप्रकाश वेल्हाळ, रविंद्र गोपाळ इंदुलकर, देवराम पांडूरंग जाधव, मनोहर अनंत शिंदे, दत्ताराम टोलू कदम, नामदेव गणपत असगोलकर, इलाई बापू नदाफ, रमेश गोपाळ वेंडल, वासुदेव महादेव पांचाळ, गणपत कृष्णा पांचाळ, दिपक शांताराम तावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. Meeting of Pensioners Association
यावेळी संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण जागुष्टे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री विजय गणपत नरोटे, राजाराम शांताराम साळवी हे उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष श्री बबन बांडागळे व राज्य कोषाध्यक्ष श्री विश्वनाथ बेलवलकर यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. जनरल सभेत वय ७५ वर्षे झालेल्या सेवानिवृत्त सभासदांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. Meeting of Pensioners Association