• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया संघटनेची नूतन कार्यकारिणी

by Manoj Bavdhankar
February 3, 2025
in Maharashtra
226 2
0
Media Association of India
444
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस; उपाध्यक्षपदी डॉ.अब्दुल कदीर; सरचिटणीसपदी लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची नियुक्ती

पुणे, ता. 03 : मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया ( माई ) संघटनेच्या संस्थापकांची  पुणे येथे बैठक संपन्न झाली. मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या  संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस व उपाध्यक्षपदी डॉ.अब्दुल कदीर आणि सरचिटणीसपदी लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. Media Association of India

“पत्रकार महामंडळ हे आमच्या  संघटनेच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या संकल्पनेतून आले आहे .त्यासाठी त्यांनी २ दिवस आमरण उपोषण केले आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ घोषित केले; हे महामंडळ गठित होणे, बजेट अधिवेशनात यासाठी तरतूद होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी त्या आग्रही आहेत.” असे संस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत यांनी सांगितले. Media Association of India

Big boost to Maharashtra's development

“आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम करण्यात येणार असून पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपली संघटना अग्रेसर कशी राहिल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे” संस्थापक अध्यक्ष शीतल  करदेकर  यांनी सांगितले. Media Association of India

यावेळी महाराष्ट्रातील विभागीय अध्यक्षांची व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. चेतन काशीकर –  खजिनदार, शेखर धोंगडे – सहसचिव पदी निवड करण्यात आली. तर मुंबई विभागीय अध्यक्ष – गणेश तळेकर ( मुंबई शहर ) व अनिल चासकर ( मुंबई उपनगर), कोकण विभागीय अध्यक्ष सुनिल कटेकर – (रायगड) व प्रवीण वाघमारे (ठाणे) मराठवाडा विभागीय अध्यक्ष – शेख मजहर (संभाजीनगर) व पुनम मिश्रा , नाशिक विभागीय अध्यक्ष – चंद्रशेखर पाटील (धुळे), अमरावती विभागीय अध्यक्ष’ सुरेंद्र आकोडे (अमरावती ), यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व संस्थापक सदस्य  उपस्थित होते. Media Association of India

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMedia Association of IndiaNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share178SendTweet111
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.