चिपळूण शाखेचे पहिले विमा प्रतिनिधी
गुहागर, ता. 15 : विमेदारांच्या उदंड सहकार्यामुळे शहरातील वरंडे विमा सेवा केंद्राचे सर्वेसर्वा आणि तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे व्यावसायिक १४ एमडीआरटी पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री. वरंडे यांना अमेरिकेला होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच ते चिपळूण शाखेचे पहिले विमा प्रतिनिधी ठरले आहेत. MDRT Award to Santosh Varande


सतत अधिकाधिक लोकांना भेटून उत्तम सेवा देताना विमा संरक्षणही वाढवून देण्यात यशस्वी झाल्याने हे शक्य झाले आहे. यासाठी मेहनत तर आहेच, पण तुमचे सर्वांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली. विमेधारकांच्या सहकार्यामुळे १४ वेळा हा बहुमान प्राप्त केल्याचे श्री. वरंडे यांनी सांगितले. या यशात कुटुंब, वरंडे विमा सेवा सर्व सहकारी, विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. श्री. वरंडे यांना मिळालेल्या यशाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. MDRT Award to Santosh Varande