• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तहसील येथे 18 रोजी जनआक्रोश मोर्चा

by Ganesh Dhanawade
December 11, 2024
in Guhagar
128 2
0
Attack on Anna Jadhav
252
SHARES
721
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : मच्छीमार बोटीवरील तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील  खारवी समाज समिती तर्फे दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गुहागर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. March at Guhagar Tehsil Office

दि. 20 ऑक्टोबर रोजी साखरी आगर येथील मच्छीमार रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणाऱ्या जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने तांडेल रविंद्र नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या केली. तसेच बोट पेटवून दिली होती. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून अशा पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. तसेच संबधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. या घटनेचा निःपक्षपातपणे पोलीस तपास व्हावा अशा मागणीच्या आशयाचे निवेदन शासन दरबारी देण्यासाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील खारवी समाज समिती गुहागरचे अध्यक्ष श्री. महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मूख मोर्चा काढण्यात येणार आहे. March at Guhagar Tehsil Office

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMarch at Guhagar Tehsil OfficeNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.